SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
सेशेल्स प्रजासत्ताकचे राष्ट्रपती डॉ.पॅट्रिक हर्मिनी यांचे मुंबईत आगमनप्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात खेळाडूंना ५ टक्के आरक्षणाचा लाभ जलदगतीने मिळण्यासाठी ‘ब्लॉकचेन तंत्रज्ञान’ वापरण्यास मान्यता‘हिंद-दी-चादर’ अंतर्गत जिल्ह्यात मोठ्या संख्येने विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे : निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष मतदारयादी पुनरिक्षण कार्यक्रम जाहीरघरफोडी करणारा आरोपी जेरबंद, 14 घरफोडीचे गुन्हे उघडकीसउत्पन्न वाढीसाठी एसटी बसेस फेऱ्यांचा वक्तशीरपणा वाढवा : परिवहन मंत्री प्रताप सरनाईकउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाढदिवस साजरा करणार नाहीतजिल्हा नियोजन समितीची येत्या बुधवारी सभाडिजिटल आशय, मनोरंजन क्षेत्रात सर्वाधिक संधी : डॉ. मारुलकर

जाहिरात

 

प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात

schedule07 Feb 26 person by visibility 96 categoryशैक्षणिक

कोल्हापूर  : प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल, कोल्हापूर येथे शैक्षणिक वर्ष २०२५–२०२६ साठीचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. प्रथम मान्यवरांच्या हस्ते चित्रकला प्रदर्शन, कार्यानुभव प्रदर्शन व रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात सांस्कृतिक कार्यक्रमाने  गणेशवंदना, बहारदार नृत्य व अभिनयाने झाली.

 कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रशालेच्या मुख्याध्यापिका  एस. आर. पाटील यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात प्रशालेचा गौरवशाली इतिहास, शैक्षणिक यश तसेच विविध उपक्रमांची माहिती दिली. प्रमुख पाहुण्यांचा परिचय पर्यवेक्षक ए. डी. भोई यांनी करून दिला.

  मान्यवरांच्या हस्ते प्रशालेच्या ‘पद्मप्रज्ञा’ हस्तलिखिताचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, माजी परीक्षा नियंत्रक, शिवाजी विद्यापीठ डॉ. बी. एम. हिर्डेकर यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना त्यांच्या भविष्यकालीन संधी, स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षण व करिअर निवडीबाबत मौल्यवान विचार मांडले.

या कार्यक्रमात शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक तसेच इतर विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षक व विद्यार्थिनींचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सल्लागार व नियामक मंडळ सदस्य विनोदकुमार लोहिया होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून विद्यार्थिनींना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

याप्रसंगी उपाध्यक्ष  नितीन वाडीकर, संस्था सचिव  पी. एस. हेरवाडे, सहसचिव  एस. एस. चव्हाण,जिमखाना प्रमुख  उमा भेंडीगिरी,  वैजयंती पाटील,  महेश सूर्यवंशी, स. म. लोहिया हायस्कूल चे प्रभारी मुख्याध्यापक  आर जी घाटगे, रोटरी क्लब ऑफ करवीरचे प्रेसिडेंट शितल दुग्गी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच आजी माजी गुणवंत विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  अश्विनी बागी व  विद्या मंडलिक यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पर्यवेक्षिका  अंजली आंबर्डेकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व विद्यार्थिनींनी विशेष परिश्रम घेतले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes