SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
सेशेल्स प्रजासत्ताकचे राष्ट्रपती डॉ.पॅट्रिक हर्मिनी यांचे मुंबईत आगमनप्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात खेळाडूंना ५ टक्के आरक्षणाचा लाभ जलदगतीने मिळण्यासाठी ‘ब्लॉकचेन तंत्रज्ञान’ वापरण्यास मान्यता‘हिंद-दी-चादर’ अंतर्गत जिल्ह्यात मोठ्या संख्येने विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे : निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष मतदारयादी पुनरिक्षण कार्यक्रम जाहीरघरफोडी करणारा आरोपी जेरबंद, 14 घरफोडीचे गुन्हे उघडकीसउत्पन्न वाढीसाठी एसटी बसेस फेऱ्यांचा वक्तशीरपणा वाढवा : परिवहन मंत्री प्रताप सरनाईकउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाढदिवस साजरा करणार नाहीतजिल्हा नियोजन समितीची येत्या बुधवारी सभाडिजिटल आशय, मनोरंजन क्षेत्रात सर्वाधिक संधी : डॉ. मारुलकर

जाहिरात

 

खेळाडूंना ५ टक्के आरक्षणाचा लाभ जलदगतीने मिळण्यासाठी ‘ब्लॉकचेन तंत्रज्ञान’ वापरण्यास मान्यता

schedule07 Feb 26 person by visibility 95 categoryक्रीडा

मुंबई  : गुणवत्ताधारक शासकीय व निमशासकीय सेवेमधील ५ टक्के आरक्षणाचा लाभ खेळाडूंना पारदर्शक, जलद व त्रुटीमुक्त पद्धतीने मिळावा, यासाठी ब्लॉकचेन व कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) या अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यास शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने मान्यता दिली असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी रश्मी आंबेडकर यांनी दिली.

रश्मी आंबेडकर म्हणाल्या की, राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांचे आयोजन करणाऱ्या सर्व अधिकृत एकविध क्रीडा संघटनांनी स्पर्धा संपल्यानंतर ७ दिवसांच्या आत स्पर्धेचा अंतिम निकाल, सहभागी खेळाडूंची यादी तसेच गुणपत्रिका अभिलेख जतनासाठी संचालनालयाकडे अपलोड करणे बंधनकारक आहे. ही सर्व माहिती संबंधित क्रीडा संघटनेच्या अधिकृत पदाधिकाऱ्यांनी डिजिटल स्वाक्षरीद्वारे प्रमाणित करणे आवश्यक आहे.

निर्धारित कालावधीत माहिती अपलोड न केल्यास संबंधित क्रीडा संघटनांचा डिफॉल्टर यादीत समावेश करण्यात येणार आहे. तसेच खेळाडूंनी आपले ‘क्रीडा ई-प्रमाणपत्र’ क्रीडा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करणे आवश्यक आहे. दोन्ही बाजूंनी अपलोड करण्यात आलेल्या माहितीची ऑनलाईन पद्धतीने पडताळणी केली जाणार आहे. या नव्या प्रणालीमुळे खेळाडूंना पडताळणीसाठी प्रत्यक्ष विभागीय कार्यालयात येण्याची किंवा कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता भासणार नाही. त्यामुळे खेळाडूंना ५ टक्के आरक्षणाचा लाभ अधिक जलद व सुलभपणे मिळणार आहे.

यासाठी खेळाडू व संबंधित क्रीडा संघटनांनी क्रीडा विभागास पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी  रश्मी आंबेडकर यांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes