SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
सीबीएसई बोर्ड परीक्षेत संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मारली बाजी RIMC प्रवेशपात्रता परीक्षेसाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढजिल्हाधिकाऱ्यांकडून दोन्ही तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा आढावाई-आर-1 विवरणपत्र 30 एप्रिलपर्यंत भरण्याचे आवाहनसेवा हक्क दिन आढावा बैठक संपन्नडी. वाय. अभियांत्रिकीचा संघ राष्ट्रीय हॅकॅथॉनमध्ये द्वितीयविरोधी पक्षनेते राजेश लाटकर व गटनेते इंद्रजित बोंद्रे यांचा कार्यालयीन प्रवेशप्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात जागतिक आवाज दिवस: आपल्या संवाद शक्तीचा अनमोल वारसा‘एसटी’चा तोटा कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

जाहिरात

 

ई-आर-1 विवरणपत्र 30 एप्रिलपर्यंत भरण्याचे आवाहन

schedule16 Apr 26 person by visibility 97 categoryराज्य

  कोल्हापूर : सर्व शासकीय, निमशासकीय, केंद्र शासन व राज्य शासन अंगिकृत व खासगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांनी त्यांच्या कार्यालयाचे ई-आर-1 विवरणपत्र 30 एप्रिल पर्यंत ऑनलाईन पध्दतीने भरावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त जमीर करीम यांनी केले.

  मार्च 2026 रोजी समाप्त होत असलेल्या तिमाहीची ई-आर-1 (त्रैमासिक) सर्व सार्वजनिक क्षेत्रातील शासकीय, निमशासकीय व खासगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांकडून त्यांच्या आस्थापनेवर असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांच्या मनुष्यबळाची सांख्यिकी माहिती (पुरुष/स्त्री ) संकलीत करण्याचे काम सुरु आहे. सांख्यिकी विभागाकडून यापूर्वीच युझरनेम व पासवर्ड देण्यात आले आहेत. ई-आर 1 विवरणपत्र सांख्यिकी माहिती प्रत्येक तिमाही नंतर महिन्याच्या 1 ते 30 तारखेपर्यंत भरणे आवश्यक आहे.

  अधिक माहितीसाठी या कार्यालयातील वरिष्ठ लिपिक रामचंद्र पांढरे यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9158432640 तसेच कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 0231-2545677 वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. तसेच कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे www.rojgar.mahaswayam.gov.in हे संकेतस्थळ पहावे.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes