SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
'स्ट्रोक' रुग्णांसाठी " रिमोट रोबोटिक न्यूरोइंटरव्हेन्शन” प्रकल्पाचा प्रस्ताव सादर करण्याच्या आरोग्यमंत्र्याच्या सुचनारोटरी क्लब कोल्हापूर हेरिटेज आणि आरसीकेओपी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गरजू महिलांना पिंक रिक्षा वाटपअर्थशास्त्र अधिविभागात माजी विद्यार्थी मेळावाकामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसाठी ‘POSH’ कायद्याची कडक अंमलबजावणी; राज्यभर तपासणी मोहीमगांधीनगर येथे तंबाखूविरोधी धडक मोहीम ; २७ जणांवर कारवाई डी. वाय. पाटील फिजिओथेरपीला सलग दुसऱ्यांदा सर्वसाधारण विजेतेपदकेंद्र सरकारच्या ऊस नियंत्रण धोरणाविरोधात जय शिवराय किसान संघटनेची कोल्हापुरात पत्रकार परिषद; नवीन कायद्यावर कडाडून टीकाधक्कादायक! 'तो' कुटुंबासह कोकण दर्शनाला गेला अन मागे मित्रानेच लुटले घर; कोल्हापुरात १५ लाखांच्या दागिन्यांसह एक गजाआडडीकेटीईच्या विद्यार्थ्यांची हरियाणा येथील बूटकॅम्पमध्ये चमकदार कामगिरीराष्ट्रीय डेंग्यू दिवस: जनजागृती आणि सतर्कतेची गरज

जाहिरात

 

सीबीएसई बोर्ड परीक्षेत संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मारली बाजी

schedule16 Apr 26 person by visibility 454 categoryशैक्षणिक

कोल्हापूर :   सीबीएसई बोर्ड इयत्ता दहावीच्या परीक्षेत 2025-26 या शैक्षणिक वर्षात संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी निकालाची उज्ज्वल परंपरा कायम ठेवत उल्लेखनीय यश संपादन केले.

या परीक्षेत श्रेया सचिन घाटगे या विद्यार्थिनीने 99% गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकावला. शुभंकर अवधूत कोरडे (98.60%) याने द्वितीय क्रमांक मिळवला. तर ईशान व्यंकटेश तारकसबंद, नमन योगानंद फुलारी, पृथ्वीराज संग्राम पाटील, जैनी मुकेशकुमार बालर आणि यश पवन पाटील या विद्यार्थ्यांनी प्रत्येकी 98.40% गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला.

विषयानुसार ‘पैकीच्या पैकी ’ गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयात सर्वाधिक 54 विद्यार्थ्यांनी 100 पैकी 100 गुण मिळवले. मराठी विषयात 20, संस्कृतमध्ये 20, इंग्रजीमध्ये 11, विज्ञान विषयात 2 तर फ्रेंचमध्ये 2 विद्यार्थ्यानी 100 पैकी 100 गुण प्राप्त केले. 

 या यशाबद्दल बोलताना संचालिका प्राचार्य सस्मिता मोहंती म्हणाल्या, " योग्य नियोजन, सराव परीक्षा, उत्कृष्ट अध्यापन, साप्ताहिक व पाठावर आधारित चाचण्या, विद्यार्थ्यांचे परिश्रम व पालकांचा विश्वास यामुळेच शाळेचा उत्कृष्ट निकाल लागलेला आहे. तसेच शाळेच्या गुणवत्तेमध्ये अधिकाधिक भर पडत आहे."  
या यशाबद्दल चेअरमन संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले यांनी संचालिका सस्मिता मोहंती, बोर्डिंग विभागाचे प्राचार्य डॉ एच एम नवीन , डे बोर्डिंग विभागाचे प्राचार्य अस्कर अली, शिक्षकवृंद आणि  विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच विद्यार्थ्यांच्या मेहनतीला आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाला यश मिळाल्याची भावना यावेळी चेअरमन संजय घोडावत यांनी व्यक्त केली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes