पिंपळगाव खुर्द येथील शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय व रुग्णालयास बी. एच. एम. एस. पदवी अभ्यासक्रमाची मान्यता
schedule04 Jul 26 person by visibility 104 categoryशैक्षणिक
◼️नवी दिल्लीच्या राष्ट्रीय होमिओपॅथी आयोगाची मान्यता
◼️आधुनिक व प्रशस्त पायाभूत सुविधांची सज्जता
कागल : वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या अथक प्रयत्नाने पिंपळगाव खुर्द येथील शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय व रुग्णालयास बी. एच. एम. एस. पदवी अभ्यासक्रमाची मान्यता मिळाली आहे. नवी दिल्लीच्या राष्ट्रीय होमिओपॅथी आयोगाने नुकतीच ही मान्यता दिलेली आहे. १०० विद्यार्थी प्रवेशक्षमतेसह अभ्यासक्रम व रुग्णालयाची मान्यता (लेटर ऑफ परमिशन (Letter of Permission)) प्राप्त झाले आहे. या मान्यतेमुळे महाराष्ट्रातील होमिओपॅथी शिक्षणाला नवी दिशा मिळणार आहे.
या महाविद्यालयात राष्ट्रीय होमिओपॅथी आयोगाच्या सर्व निकषांनुसार आधुनिक व प्रशस्त पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या आहेत. अत्याधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा, डिजिटल एक्स-रे युनिट, मेडिसिन, शल्यचिकित्सा, स्त्रीरोग व प्रसूतीतंत्र तसेच; बालरोग विभागांच्या स्वतंत्र बाह्यरुग्ण सेवा (OPD), तसेच ५० खाटांचे सुसज्ज आंतररुग्ण विभाग (IPD) कार्यान्वित करण्यात आले आहेत. आजतयागत १०, ००० पेक्षा जास्त रुग्णांनी ह्या सेवेचा लाभ घेतला आहे.
येथे विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासासाठी अत्याधुनिक स्किल लॅब, मेडिकल एज्युकेशन टेक्नॉलॉजी (MET) युनिट, ई-लर्निंग सुविधा, तसेच; राष्ट्रीय अभ्यासक्रमानुसार अद्ययावत पुस्तके, जर्नल्स व ई-रिसोर्सेसनी समृद्ध ग्रंथालय उपलब्ध करून देण्यात आले आहे. गुणवत्तापूर्ण अध्यापनासाठी अनुभवी प्राध्यापक, प्रशिक्षित कर्मचारी आणि आधुनिक अध्यापन साधनांचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
कागल येथील हे महाविद्यालय पश्चिम महाराष्ट्रातील पहिले व संपूर्ण महाराष्ट्रातील दुसरे शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय आहे. उच्च दर्जाचे शिक्षण, गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा आणि कौशल्याधारित वैद्यकीय प्रशिक्षण यांचा संगम साधत हे महाविद्यालय १०० विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी पूर्णतः सज्ज आहे. राज्यातील होमिओपॅथी शिक्षण व आरोग्यसेवेत महत्त्वपूर्ण योगदान देण्यास सिद्ध झाले आहे. अशी माहिती अधिष्ठाता डॉ. अभिजीत अहिरे यांनी दिली.