SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
साखर कारखानदारी आणि शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी 'कोल्हापुरात' एल्गार; 'शेतकरी व साखर कारखानदारी बचाव आंदोलना'ची स्थापनाके.डी.सी.सी. बँकेची पीक कर्ज वसुली ८६.२२ टक्के दहावी नंतरच्या पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जाहीर; ६ जुलैपर्यंत नोंदणीची संधीडी. वाय. पाटील अभियांत्रिकी केमिकलच्या ५५ विद्यार्थ्यांना प्लेसमेंटकागलच्या जयसिंगराव तलावाजवळचा कालवा अस्तरीकरणासह पूर्ण करापुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्र शेतकऱ्यांच्या थकीत कर्जावर व्याज आकारणीस स्थगितीगडहिंग्लज-चंदगड मार्गावरील भडगाव येथील पर्यायी पूल वाहतुकीसाठी बंद; वाहतूक आजरा मार्गे वळवलीकोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम: पंचगंगा नदीवरील अनेक बंधारे पाण्याखालीप्लास्टिकमुक्तीचा संकल्प: वसुंधरेच्या श्वासासाठी एक पाऊल पुढे!कोल्हापुरात पावसाचे पुनरागमन: पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ, बळीराजा सुखावला!

जाहिरात

 

डी. वाय. पाटील अभियांत्रिकी केमिकलच्या ५५ विद्यार्थ्यांना प्लेसमेंट

schedule03 Jul 26 person by visibility 149 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी , कसबा बावडा येथील केमिकल इंजिनिअरिंग विभागातील ५५ विद्यार्थ्यांना विविध नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीसाठी निवड झाली आहे. विद्यार्थ्याना वार्षिक ६.५० लाख रुपयापर्यंत पॅकेज मिळाले आहे. 

एकूण १८ आघाडीच्या कंपन्यांमध्ये महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याना प्लेसमेंट मिळाली आहे. यामध्ये मुंबईस्थित टेक्निमोंट आयसीबी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये किरण ढेरे याची वार्षिक ६.५० लाख रुपये पॅकेजवर निवड झाली  आहे. तसेच सोलर ग्रुप लिमिटेड, नागपूर येथे सहा विद्यार्थ्यांची ५.५० लाख रुपये वार्षिक पॅकेजवर निवड झाली आहे.

हार्मोनी ऑरगॅनिक्स लिमिटेड, पुणे या कंपनीमध्ये १२ विद्यार्थ्यांची, तर प्लॅटेक्स इंडिया लिमिटेड, पुणे या कंपनीने ८ विद्यार्थ्यांची निवड केली आहे. याशिवाय एम. जे. बायोफार्म, डब्ल्यूटीई इन्फ्रा प्रोजेक्ट्स, प्रिव्ही स्पेशालिटी केमिकल्स, लक्ष्मी  ऑरगॅनिक्स, बायोकॉन, एकर सोल्युशन्स, एजिस ग्रुप, मोसिल ल्युब्रिकंट्स,एच.एक्स इंडिया प्रा.लि, वैशुभटेक इनोव्हेशन्स प्रायव्हेट लिमिटेड, जयश्री पॉलिमर्स, एलेस्क्रिप्ट आणि इतर नामांकित कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना संधी मिळाली आहे. 

कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता  म्हणाले,  संस्थेकडून  दिले जाणारे उद्योगाभिमुख शिक्षण, तांत्रिक प्रशिक्षण, व्यक्तिमत्त्व विकास, कम्युनिकेशन स्किल्स, सॉफ्ट स्किल्स आणि मुलाखतपूर्व तयारीचे विशेष मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालय सातत्याने प्रयत्नशील असून त्याचा सकारात्मक परिणाम प्लेसमेंटमध्ये दिसून आला. 

या विद्यार्थ्यांना अधिष्ठाता (सीडीसीआर) प्रा. सुदर्शन सुतार, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. मकरंद काईंगडे, केमिकल विभागप्रमुख डॉ.के.टी.जाधव, प्लेसमेंट समन्वयक, ट्रेनिंग समन्वयक तसेच सर्व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.

संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता, सी. एच. आर. ओ. श्रीलेखा साटम,  प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे, विभागप्रमुख डॉ.के.टी.जाधव,  यांनी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes