बकर ईद (ईदुल अजहा) शनिवारी ७ जून रोजी होणार
schedule28 May 25 person by visibility 280 categoryराज्य

कोल्हापूर : हिलाल कमिटी [चांद कमिटीची बैठक आज बुधवारी 28 मे रोजी सालाबद प्रमाणे मौ. मन्सूर आलम कासमी यांचे अध्यक्षतेखाली मुस्लिम बोडींग, कार्यालयामध्ये सायंकाळी मगरीब नमाज नंतर झाली.
सदर बैठकीमध्ये मुंबई हिलाल कमिटी, बंगलोर, लखनौ, दिल्ली, देवबंद, आमारते शरिआ पटना या सर्व हिलाल कमिटी, तसेच अन्य शहरांशी संपर्क साधण्यात आला. या ठिकाणाहून चंद्रदर्शनाची साक्ष मिळाल्याने बकर ईद (ईदुल अजहा) शनिवार दि.7 जून रोजी साजरी होणार असल्या बाबत निर्णय उलमा हिलाल कमिटीचे अध्यक्ष मौ. मन्सूर आलम कासमी यांनी जाहीर केला.
सदर प्रसंगी मौ. इरफान कासमी, मौ. मोबीन बागवान, मौ. नाझिम पठाण, मौ. अब्दुस सलाम कासमी, मुफ्ती ताहीर बागवान, हाफीज समीर उस्ताद, मौ. इमरान सनदी, काजी अश्रफ खान पठाण, हाफिज यूनुस शेख, मौ. अब्दुल वाहिद सिद्दीकी, मौ अबुतालीब सिद्दीकी तसेच मुस्लिम बोर्डीगचे सर्व पदाधिकारी, कोल्हापूर शहर व उपनगरातील सर्व मसजिदचे पेशइमाम व अनेक मान्यवर व्यक्ती उपस्थित होते.
असे पत्रक हिलाल कमिटी चांद कमिटीचे अध्यक्ष मौलाना मन्सूर आलम कासमी व दि मोहामेडम एज्युकेशन सोसायटी (मुस्लिम बोर्डिंगचे) चेअरमन गणी आजरेकर यांनी प्रसिद्धीस दिले आहे.