SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध; भीतीपोटी अनावश्यक खरेदी टाळावी : मंत्री छगन भुजबळकोल्हापुरात दोन दुचाकी चोरांसह एका अल्पवयीन मुलाला अटक; २.२५ लाखांच्या ४ गाड्या जप्त'चालुक्याज क्रीडा महोत्सव २०२६': बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धेचा कोल्हापुरात दिमाखदार शुभारंभ!डॉ. संजय डी. पाटील यांचा ‘सोशल इम्पॅक्ट अवॉर्ड'ने सन्मान; उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते गौरवघोडावत विद्यापीठात होणार जागतिक दर्जाचे डिझाईन स्कूल हॅमस्टेक कॉलेज सोबत सामंजस्य करार; डिझायनर नीता लुल्ला यांची उपस्थितीनिसर्गाचा अनमोल ठेवा: जागतिक जैवविविधता दिनकोल्हापुरात इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचे जोरदार आंदोलनकोल्हापुरात खळबळ: भाऊसिंगजी रोडवरून ३० तोळे सोन्याचे दागिने लंपास!घोडावत विद्यापीठातील 49 विद्यार्थ्यांची निवडप्रतीक्षा संपली! डॉ. रजनीश कामत शिवाजी विद्यापीठाचे नवे कुलगुरू

जाहिरात

 

'चालुक्याज क्रीडा महोत्सव २०२६': बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धेचा कोल्हापुरात दिमाखदार शुभारंभ!

schedule22 May 26 person by visibility 207 categoryक्रीडा

कोल्हापूर : येथील चालुक्याज स्पोर्ट्स अकॅडेमीच्या वतीने आयोजित "चालुक्याज क्रीडा महोत्सव २०२६" अंतर्गत बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धेचा प्रारंभ अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात झाला. ही स्पर्धा २१ ते २३ मे २०२६ या कालावधीत पार पडत असून, तिचे अधिकृत उद्घाटन आंतरराष्ट्रीय शूटर व शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या राधिका हवलदार यांच्या हस्ते चषकाचे अनावरण करून करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्झलनाने झाली.

 याप्रसंगी रोहित हवालदार, पै. दत्ताजी अंधळकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. शिवाजी साळुंखे, संचालक धैर्यशील पुंगावकर व श्रुती पुंगावकर आदी मान्यवर उपस्थित होते. या सर्व पाहुण्यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुण्या राधिका हवलदार यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना सांगितले की, "खेळात जिंकणे किंवा हरणे महत्त्वाचे नाही, तर खिलाडूवृत्ती महत्त्वाची आहे. क्रीडा क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी खेळाडूंनी शिस्त, सातत्य, चिकाटी, संघभावना आणि सकारात्मक दृष्टीकोन ठेवणे आवश्यक आहे." दरम्यान, कोल्हापूर जिल्हा बास्केटबॉल क्षेत्रातील राष्ट्रीय खेळाडू व युवा प्रशिक्षक उदय पाटील यांच्या अकाली निधनाबद्दल कार्यक्रमात तीव्र शोक व्यक्त करण्यात आला; तसेच त्यांच्या स्मरणार्थ उपस्थितांनी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

या भव्य स्पर्धेत राज्यभरातून १६ वर्षांखालील गटातील ११ मुलांचे आणि ९ मुलींचे संघ सहभागी झाले आहेत. "बास्केटबॉल हा केवळ उंचीचा खेळ नसून, तो सांघिक भावना, जलद निर्णयक्षमता आणि शेवटपर्यंत लढण्याच्या जिद्दीचा संगम आहे," असे आयोजकांनी यावेळी नमूद केले. अकॅडेमीचे अध्यक्ष प्रा. शिवाजी साळुंखे यांनी, चालुक्य स्पोर्ट्स अकॅडेमी राज्य व राष्ट्रीय स्तरावर दर्जेदार खेळाडू घडवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असून या स्पर्धेमुळे तरुणांना उत्तम व्यासपीठ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes