SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
वाशी येथे 'स्वामी क्लिनिक'चा भव्य शुभारंभ; माफक दरात मिळणार आरोग्य सेवाडी. वाय.पाटील स्कूल ऑफ मॅनेजमेंटच्या एमबीए विद्यार्थ्यांचा आयआयएम तिरुचिरापल्ली येथे डोमेस्टिक इमर्शन प्रोग्राम संपन्नस्ट्रक्चरल इंजिनिअर्सना आता हवी व्यावसायिक सुरक्षा; महाबळेश्वर येथे राज्यस्तरीय बैठकीत ठरावनवनिर्वाचित नगरसेवकांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यशाळेस उत्साहात प्रारंभराज्य उत्पादन शुल्क विभागात नवीन १०८८ पदांची भरती प्रक्रिया सुरूकोल्हापूर जिल्ह्यातील 51 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणात 4.89 टीएमसी पाणीसाठाआजचा फॅशन डे: स्वतःच्या शैलीचा नवा आविष्कारमहाराष्ट्रात नर्सिंग शिक्षणाची दहा नवीन सरकारी महाविद्यालये मंजूर; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती​‘त्या’ घटनेने पेठवडगाव सुन्न: भरदिवसा, भररस्त्यात पत्नीचा बळी; आरोपी पतीच्या शोधात पोलीसपंचगंगा घाट व शाहू मिल परिसराची महापौर रुपाराणी निकम यांच्याकडून पाहणी; आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश

जाहिरात

 

राज्य उत्पादन शुल्क विभागात नवीन १०८८ पदांची भरती प्रक्रिया सुरू

schedule09 Jul 26 person by visibility 94 categoryराज्य

 ▪️मॅटच्या स्थगितीमुळे पद रिक्ततेचे प्रमाण ३४ टक्क्यांवर 
  ▪️मोठ्या जिल्ह्यांसाठी मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर व अहिल्यानगर येथे नवीन अधीक्षक कार्यालयांची निर्मिती
  ▪️पावसाळी अधिवेशनात मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

  मुंबई : राज्य उत्पादन शुल्क विभागात नव्याने निर्माण केलेल्या १०८८ पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान; संवर्ग तीनच्या पदांना मॅटने दिलेल्या स्थगितीमुळे पद रिक्ततेचे प्रमाण ३४ टक्क्यांवर पोहोचले आहे. ही स्थगिती उठून भरती पूर्ण झाल्यानंतर या विभागाच्या कामकाजाला गती मिळेल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी पावसाळी अधिवेशनात दिली. मोठ्या जिल्ह्यांसाठी मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर व अहिल्यानगर येथे नवीन अधीक्षक कार्यालयांची निर्मिती केल्याचेही त्यांनी सांगितले.

  विधानपरिषेच्या आमदार श्रीमती उमा खापरे यांनी अर्धा तास चर्चेवरील सूचनेमध्ये उपस्थित केलेल्या प्रश्नाला विभागातील रिक्त पदे आणि महसूल उद्दिष्टांची पूर्तता याबाबत श्री. मुश्रीफ यांनी सविस्तर माहिती दिली.

  या उत्तरात मंत्री श्री. मुश्रीफ यांनी दिलेली सविस्तर माहिती अशी......
  ■ ३४ टक्के पदे रिक्त; मॅटमधील स्थगितीमुळे विलंब:
राज्य उत्पादन शुल्क विभागास ३१ जुलै २०२५ रोजी नव्याने १०८८ नियमित पदे मंजूर झाली असून, विभागाचा एकूण आकृतीबंध ४९२६ पदांचा झाला आहे. या नव्याने निर्माण केलेल्या १०८८ पदांची भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे. यातील काही पदे सरळसेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत तर काही पदे पदोन्नतीने भरण्यात येत आहेत. परंतु, यामधील प्रामुख्याने तीन संवर्गाला महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट - MAT) मध्ये स्थगिती मिळाल्यामुळे ही पदे भरण्यास काही कालावधी लागणार आहे. यामुळे सद्यस्थितीला विभागात रिक्ततेचे प्रमाण ३४ टक्क्यांवर पोहोचले आहे. मॅटमधील स्थगिती उठल्यानंतर आणि भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विभागाच्या कामकाजाला अधिक गती मिळेल. ३१ जुलै २०२५ पूर्वी विभागाचा ३८३८ नियमित पदांचा आकृतीबंध मंजूर होता, ज्यामध्ये रिक्ततेचे प्रमाण केवळ १४ टक्के एवढे होते.

  ■ सहा नवीन अधीक्षक कार्यालयांची निर्मिती:
विभागाचा विस्तार आणि कामाचा वाढता ताण लक्षात घेता, नव्याने निर्माण केलेल्या पदांमधून राज्यातील सहा मोठ्या जिल्ह्यांमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाची प्रत्येकी एक नवीन अशी एकूण सहा नवीन अधीक्षक कार्यालये तयार करण्यात आली आहेत. यामध्ये मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर व अहिल्यानगर या जिल्ह्यांचा समावेश आहे.

  ■ MPSC कडे ३०९ पदांचे मागणीपत्र:
भरती प्रक्रियेला गती देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरावयाच्या ३०९ पदांचे मागणीपत्र सादर करण्यात आले आहे. तसेच; उर्वरित पदे पदोन्नतीने भरण्याची कार्यवाही सध्या विभाग स्तरावर वेगाने सुरू आहे.

  ■ महसूल उद्दिष्ट आणि प्राप्ती:
  □ सन २०२५-२६: या वर्षासाठी विभागाला ₹ ३,२५७.०५ कोटी महसुलाचे उद्दिष्ट देण्यात आले होते, त्यापैकी ₹ २,९९५.८ कोटी महसूल प्राप्त झाला आहे.

  □ सन २०२६-२७ : चालू आर्थिक वर्षाकरिता ₹ ३,७५१.८ कोटी एवढे मोठे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, जून २०२६ अखेरपर्यंत ₹ ६८८.३ कोटी महसूल प्राप्त झाला आहे.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes