SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर कारखान्यास सर्वाेत्कृष्ट पुरस्कार प्रदानसंजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये जागतिक उद्योजक दिवस उत्साहात साजराकोल्हापूर महापालिका नगरसेविका ॲड. मानसी लोळगे यांचा गंभीर आरोप; तानाजी जाधवविरुद्ध पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रारडी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमध्ये उद्या शनिवारी सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शनडी.वाय.पी. ग्रुपतर्फे महानगरपालिकेला १५५० एलईडी दिव्यांची भेटवैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची कोल्हापुरात महत्त्वपूर्ण प्रेस कॉन्फरन्स; ऊस, गोकुळ आणि 'शक्तिपीठ'बाबत रोखठोक भूमिकासीपीआर तो सिर्फ झांकी है, शेंडा पार्क अभी बाकी हैमहसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे रविवारी कोल्हापुरात नागरिकांची निवेदने स्वीकारणारपाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवाचा संदेश देत महावॉकेथॉन रॅली संपन्नकोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 4.73 मिमी पावसाची नोंद; गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 32.3 मिमी पावसाची नोंद

जाहिरात

 

कोल्हापूर महापालिका नगरसेविका ॲड. मानसी लोळगे यांचा गंभीर आरोप; तानाजी जाधवविरुद्ध पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार

schedule21 Aug 26 person by visibility 153 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या विद्यमान नगरसेविका ॲड. मानसी सतिश लोळगे यांनी तानाजी आनंदराव जाधव या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीविरुद्ध जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात अधिकृत तक्रार दाखल केली आहे. जाधव हा सातत्याने सोशल मीडियावर खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती पसरवून त्यांची सामाजिक प्रतिमा मलीन करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

▪️ महिला लोकप्रतिनिधींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
तानाजी जाधव प्रभागातील विकासकामांमध्ये अडथळे निर्माण करत असून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहे. ही व्यक्ती वैयक्तिक टीका करत असून, हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर असल्याचे आणि एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या सुरक्षिततेची चिंतेची बाब असल्याचे ॲड. लोळगे यांनी म्हटले आहे. या प्रकारामुळे त्यांना सार्वजनिक जीवनात वावरताना असुरक्षित वाटत असल्याचे त्यांनी नमूद केले.

▪️महापालिका कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना दमदाटी
आरोपी तानाजी जाधव हा महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकारी, सॅनिटरी इन्स्पेक्टर, सफाई कर्मचारी आणि पाणी पुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांना शासकीय कामांपासून रोखत आहे. कचऱ्याची गाडी अडवणे, वाहनांच्या चाव्या काढून घेणे आणि प्रभागात पायाभूत सुविधा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांना धमकावणे असे प्रकार तो करत असल्याची माहिती तक्रारीत देण्यात आली आहे.

▪️ शिवीगाळ, अश्लील हावभाव व महिलांचे विनापरवाना चित्रीकरण
नगरसेविका आणि त्यांचे वडील प्रभागातील कामे पूर्ण करण्यासाठी जात असताना तानाजी जाधव चालकांना शिवीगाळ व दंगा करत असतो. युवती असल्यामुळे आपल्याला लज्जा उत्पन्न होईल असे हावभाव करणे, टोमणे मारणे आणि रागाने बघणे असे प्रकार तो करत असल्याचा आरोप ॲड. लोळगे यांनी केला आहे. तसेच, महिलांचे चित्रीकरण करून ते सोशल मीडियावर (इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सॲप) प्रसारित करण्याची धमकी देत असल्यामुळे प्रभागात त्याची प्रचंड दहशत आहे.

▪️पालिकेतील विविध पदाधिकाऱ्यांचा तीव्र पाठिंबा
या तक्रारीत कोल्हापूर महापालिकेच्या अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आणि नगरसेवकांनी सहभाग व पाठिंबा दर्शवला आहे. यामध्ये उपमहापौर अक्षय विक्रम जरग, स्थायी समिती सभापती विशाल किरण शिराळे, महिला व बाल कल्याण समिती सभापती सौ. कौसर बागवान, नगरसेवक जयंत पाटील, सभागृह नेता मुरलीधर पांडुरंग जाधव, शिवसेनेचे गटनेता शारंगधर वसंतराव देशमुख, राष्ट्रवादीचे गटनेता आदिल बाबू फरास यांच्यासह अनेक नगरसेवक व माजी नगरसेवकांचा समावेश आहे.

▪️तातडीने कठोर कारवाईची मागणी
तानाजी आनंदराव जाधव याच्या त्रासामुळे प्रभागात काम करताना अडचणी येत असून आपल्याला व आपल्या वडिलांना या व्यक्तीपासून धोका असल्याची भीती ॲड. लोळगे यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तानाजी जाधव याचा त्वरीत बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes