SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे रविवारी कोल्हापुरात नागरिकांची निवेदने स्वीकारणारपाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवाचा संदेश देत महावॉकेथॉन रॅली संपन्नकोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 4.73 मिमी पावसाची नोंद; गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 32.3 मिमी पावसाची नोंदभारताचे संगीतरत्न: उस्ताद बिस्मिल्ला खाँराजेंद्रनगर घरफोडीचा गुन्हा उघड; १०२ ग्रॅम सोने व १६ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्तकोल्हापुरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई; ४३२ चालकांकडून ३,८०,८५० रुपयांचा दंड वसूलरंकाळा परिसरातील रस्त्यांवरील अडथळे हटविण्यासाठी धडक कारवाई; 250 हून अधिक हातगाड्या हटविल्याथकबाकीदार व अनधिकृत नळ कनेक्शनधारकांवर महापालिकेची कारवाईकंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समावेशनाचा प्रस्ताव मुख्य सचिवांच्या समितीकडे पाठवावा : पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटीललोकभवन येथे राज्यपालांकडून सद्भावना प्रतिज्ञा; दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांना अभिवादन

जाहिरात

 

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे रविवारी कोल्हापुरात नागरिकांची निवेदने स्वीकारणार

schedule21 Aug 26 person by visibility 12 categoryराजकीय

कोल्हापूर : भारतीय जनता पार्टीच्या ‘सेवा अभियान’ अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते व सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबतची निवेदने शासनापर्यंत पोहोचविण्याचा उपक्रम सुरू आहे. भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र दादा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.

या अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री  चंद्रशेखर बावनकुळे हे रविवारी, दि. २३ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजता कोल्हापुरात नागरिकांची निवेदने स्वीकारणार आहेत.

हा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे होणार आहे. नागरिकांनी आपल्या विविध प्रश्नांबाबतची लेखी निवेदने घेऊन उपस्थित राहावे. निवेदन सादर करताना हार, पुष्पगुच्छ किंवा इतर सत्कार साहित्य आणू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिक, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपल्या परिसरातील प्रलंबित प्रश्नांची निवेदने या उपक्रमाद्वारे सादर करून ‘सेवा अभियानात’ सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपा कोल्हापूरच्या वतीने करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes