काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या श्रीमती सोनिया गांधी यांनी खासदार शाहू छत्रपती महाराजांना दिल्या शुभेच्छा
schedule08 Jun 24 person by visibility 533 categoryराजकीय

नवी दिल्ली : नवनिर्वाचित खासदार शाहू छत्रपती महाराजांनी काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या श्रीमती सोनिया गांधी यांची भेट घेतली. श्रीमती सोनिया गांधी यांनी महाराजांना शुभेच्छा देत अभिनंदन केले.
यावेळी सोनिया गांधी यांनी शाहू महाराजांच्या सारखे अनुभवी व सुसंस्कृत नेतृत्व लाभले याचा काँग्रेस पक्षाला निश्चितपणे फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती उपस्थित होते.