विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेतेपदाबाबत काँग्रेसचे बडे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
schedule09 Sep 25 person by visibility 257 categoryराजकीय

मुंबई : काँग्रेससच्या जेष्ठ नेत्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. या बैठकीत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेतेपदाबाबत चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान आमदार सतेज पाटील यांची नियुक्ती केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अंबादास दानवे यांचा विरोधी पक्षनेते पदाचा कार्यकाळ 29 ऑगस्ट रोजी संपल्याने ही जागा रिक्त असून यासाठी काँग्रेस आग्रही आहे.
काल देखील या महत्वाच्या नेत्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यांनंतर आज फडणवीसांची भेट घेत हिवाळी अधिवेशनापूर्वी विरोधीपक्षनेतेपदाची निवड करावी अशी मागणी काँग्रेस नेत्यांनी केली आहे.