SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात उद्यापासून रमजान पर्वाला प्रारंभ; आज रात्री पहिली 'तरावीह'डॉ. संजय डी. पाटील यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षावकेआयटी मध्ये राष्ट्रीय स्तरावरील ‘ पायोनियर-२६’ चे आयोजन; ६००० स्पर्धकांच्या सहभागाने होणार सृजनशील तंत्रज्ञानाचे अमृत मंथनछत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांच्या अभ्यासासाठी मालवण येथे अध्यासन केंद्र : सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार; शासनाकडून निधी मंजुरराज्यपालांच्या हस्ते सुरेश प्रभू यांच्या जीवनचरित्राचे प्रकाशनआयटीआयच्या दोन लाख विद्यार्थ्यांना मिळणार आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण : कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची संकल्पनाकोल्हापूर जिल्ह्यात CSR अंतर्गत मोफत शस्त्रक्रिया अभियानमहाराष्ट्रातील राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या 7 जागांसाठी 16 मार्चला मतदानकातळशिल्पांच्या संशोधनाकरिता वर्ल्ड हेरिटेज डेस्क स्थापन : मंत्री ॲड. आशिष शेलार बनावट वेबसाईटस्‌, ॲप आणि खोट्या ई-चलन लिंकपासून सावध राहा; परिवहन विभागाचे नागरिकांना आवाहन

जाहिरात

 

डॉ. संजय डी. पाटील यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव

schedule18 Feb 26 person by visibility 212 categoryसामाजिक

कोल्हापूर  : डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष आणि डी. वाय. पाटील विद्यापीठ कोल्हापूर, तळसंदे व आकुर्डीचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांचा ६२ वा वाढदिवस बुधवारी उत्साहात साजरा करण्यात आला. कसबा बावडा येथील निवासस्थानी कुटुंबीयांनी औक्षण करून त्यांना दीर्घायुष्यसाठी शुभेच्छा दिल्या. वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्याकरिता विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गर्दी मोठी केली  होती. 

 शिक्षण, आरोग्य, कृषी, सहकार सह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे डॉ. संजय डी. पाटील आणि  त्यांच्या स्नुषा डी. वाय. पाटील ग्रुपच्या ॲडव्हायझर  पूजा ऋतुराज पाटील या दोघांचाही एकाच दिवशी वाढदिवस असल्याने कुटुंबीयांकडून वाढदिवस एकत्रितपणे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या दोघानाही माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी वाय. पाटील आणि  शांतादेवी डी. पाटील यांनी डॉ. संजय डी. पाटील आणि   पूजा ऋतुराज पाटील  यांना शुभाशीर्वाद दिले. यावेळी  वैजयंती संजय पाटील,  माजी आमदार ऋतुराज संजय पाटील, पृथ्वीराज संजय पाटील,  वृषाली पृथ्वीराज पाटील,  सत्यजित पाटील बेनाडीकर, अभिजित पाटील बेनाडीकर,  अर्जुन व आर्यमन पाटील यांच्यासह कुटुंबीय उपस्थित होते.

   डॉ. संजय डी. पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या निवासस्थानी आणि कदमवाडी येथील मेडिकल कॉलेज सभागृहात उपस्थिती लावली. यामध्ये माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, देवराज पाटील, शिवाजी विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. ए. एन. जाधव,  उद्योजक दिलीप मोहिते, आनंद माने, प्रताप उर्फ भैय्या माने, प्राचार्य डॉ. डी. आर. मोरे, प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील, डॉ. मंजिरी मोरे, डॉ. सागर डेळेकर, डॉ. प्रताप पाटील, डॉ. सचिन पवार, डॉ. संदीप पाटील, माजी पोलीस अधिकारी राजेंद्र घाटगे, सोहन शिरगावकर, दौलत देसाई, क्रीडाईचे अजय डोईजड, राजेश लाटकर, इंद्रजीत बोंद्रे यांच्यासह कोल्हापूर महानगर पालिकेचे कॉंग्रेसचे सर्व नगरसेवक, कॉंग्रेसचे जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य, श्रीराम सोसायटीचे उपसभापती सुभाष गदगडे व सर्व आजी माजी संचालक, शिवाजी विद्यापीठाचे अधिकारी, महालक्ष्मी मंदिर कर्मचारी, डी. वाय. पाटील साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक जयदीप पाटील व संचालक,  डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, डॉ. व्ही. व्ही. भोसले, आकुर्डी येथील डी. वाय. पाटील  कॅम्पसचे डायरेरेक्टर अमित विक्रम व  प्राचार्य,  सी.एच.आर. ओ. श्रीलेखा साटम, सीए. अमित गावडे, अँड. अजित पाटील, अँड. अभिषेक मिठारी यांच्यासह डी. वाय. पाटील ग्रुपमधील विविध संस्थांचे प्रमुख, प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी, विविध प्रसारमाध्यमांचे संपादक, अधिकारी,  पत्रकार, शिक्षण, सहकार, राजकीय, सामाजिक व औद्योगिकसह विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी डॉ. पाटील यांना शुभेच्छा दिल्या. विविध मान्यवरांनी दूरध्वनीद्वारे डॉ. पाटील व सौ. पूजा पाटील यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या.

🟠 दुर्मिळ माहिती संग्रह प्रदर्शन 🟠
डॉ. संजय डी. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मेडिकल कॉलेजच्यावतीने दुर्मिळ माहिती संग्रह प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. यामध्ये विविध वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेले कोल्हापूरमधील विविध ठिकाणे, वैशिष्ट्ये याची माहिती देणारी कात्रणे मांडण्यात आली होती.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes