SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात उद्यापासून रमजान पर्वाला प्रारंभ; आज रात्री पहिली 'तरावीह'डॉ. संजय डी. पाटील यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षावकेआयटी मध्ये राष्ट्रीय स्तरावरील ‘ पायोनियर-२६’ चे आयोजन; ६००० स्पर्धकांच्या सहभागाने होणार सृजनशील तंत्रज्ञानाचे अमृत मंथनछत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांच्या अभ्यासासाठी मालवण येथे अध्यासन केंद्र : सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार; शासनाकडून निधी मंजुरराज्यपालांच्या हस्ते सुरेश प्रभू यांच्या जीवनचरित्राचे प्रकाशनआयटीआयच्या दोन लाख विद्यार्थ्यांना मिळणार आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण : कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची संकल्पनाकोल्हापूर जिल्ह्यात CSR अंतर्गत मोफत शस्त्रक्रिया अभियानमहाराष्ट्रातील राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या 7 जागांसाठी 16 मार्चला मतदानकातळशिल्पांच्या संशोधनाकरिता वर्ल्ड हेरिटेज डेस्क स्थापन : मंत्री ॲड. आशिष शेलार बनावट वेबसाईटस्‌, ॲप आणि खोट्या ई-चलन लिंकपासून सावध राहा; परिवहन विभागाचे नागरिकांना आवाहन

जाहिरात

 

केआयटी मध्ये राष्ट्रीय स्तरावरील ‘ पायोनियर-२६’ चे आयोजन; ६००० स्पर्धकांच्या सहभागाने होणार सृजनशील तंत्रज्ञानाचे अमृत मंथन

schedule18 Feb 26 person by visibility 127 categoryशैक्षणिक

कोल्हापूर  : केआयटी अभियांत्रिकी (प्रदत्त स्वायत्त) महाविद्यालयाच्या वतीने गेली अनेक वर्षे  पायोनियर या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन (आय.एस.टी.ई.) च्या चॅप्टर अंतर्गत या स्पर्धेचे आयोजन केले जाते. यावर्षी ही स्पर्धा दिनांक २१-२२ फेब्रुवारी २६  रोजी महाविद्यालयात संपन्न होणार आहे. देशभरातील या गोवा, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, तमिळनाडू, केरळ, राजस्थान,आंध्रप्रदेश या  ८ राज्यातून आय.आय.टी.,एन.आय.टी.,बीटस,सी.ओ.ई.पी सह ९२ महाविद्यालयातून किमान ६००० तांत्रिक शिक्षण घेणारे विद्यार्थी तांत्रिक महोत्सवातील विविध स्पर्धांमध्ये सहभागी होणार आहेत.

मुख्यत्वे केआयटी च्या मध्यवर्ती आयोजकांकडून ‘प्रकल्प’ या राष्ट्रीय स्तरावरील प्रोजेक्ट प्रदर्शन, तसेच ‘अभिव्यक्ती’ राष्ट्रीय स्तरावरील पेपर प्रेझेंटेशन स्पर्धेचे आयोजन केले आहे. प्रोजेक्टची स्पर्धा 3 महत्त्वाच्या विभागात होणार आहे. तर पेपर प्रेझेंटेशन साठी सर्किट व नॉन सर्किट डोमेन मधून सुमारे १२ विविध विषयांवर पेपर प्रेझेंटेशन करता येणार आहे. प्रकल्प स्पर्धेतून निवडले गेलेले विजेत्या प्रोजेक्ट्सना केआयटी आयआरएफ च्या वतीने इनक्युबेशन करून त्या प्रोजेक्ट्सना स्टार्टप्ससाठी गतवर्षी प्रमाणे सहकार्य केले जाणार आहेत. तसेच अभिव्यक्ती या पेपर प्रेझेंटेशन कॉम्पिटिशन मधील सादर झालेल्या निवडक दर्जेदार पेपर्सचे आयएसएसएन प्रोसिडिंग्स केले जाणार आहे. संशोधक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी होऊन आपल्या पेपरचे प्रोसिडिंग बुक सहभाग होईल अशा दर्जाचे काम सादर करावे असे आवाहन संचालक डॉ मोहन वनरोट्टी  यांनी केले आहे .मध्ये विशेषतः यावर्षी ‘बॅटल ब्लीटस’ च्या अंतर्गत ऑनलाईन गेमींगच्या स्पर्धेचे आयोजन केले गेले आहे

केआयटी मधील ९ विभागांच्या वतीने पुढील नऊ स्पर्धा आयोजित केल्या आहेत. अशा प्रकारच्या ९ विविध तांत्रिक स्पर्धांचे आयोजन केले आहे.सुमारे पाच लाख रुपये रोख रक्कमेची बक्षिसे या स्पर्धेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना दिली जाणार आहेत. 
या स्पर्धेचे उद्घाटन दिनांक २१ फेब्रुवारी २६ रोजी कमिंस इंडियाचे व्हाईस प्रेसिडेंट व प्लांट हेड श्री. संजय बाबर यांच्या हस्ते होणार आहे. तर समारोप व  बक्षीस समारंभ साठी जिओ मॅट्रिक्स ऑटोमेशन अँड रोबोटिक्स प्रायव्हेट लिमिटेड चे एम.डी श्री प्रफुल्ल कुमार कंचनी उपस्थित राहणार आहेत.

सुमारे ४०० विद्यार्थी १५० प्राध्यापक या सर्व सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी सक्रियपणे योगदान देत आहेत. या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमध्ये सर्वांनी सहभागी होऊन स्वतःच्या क्षमतांना आव्हान देऊन या स्पर्धांच्या माध्यमातून स्वतःच्या तांत्रिक ज्ञानाची, कौशल्याचा स्तर  जाणून  घ्यावा  असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष  साजिद हुदली यांनी केले. संस्थेचे उपाध्यक्ष  सचिन मेनन सचिव  दीपक चौगुले यांचे विशेष मार्गदर्शन या कार्यक्रमासाठी मिळत आहे. डॉ.संदीप देसाई हे या स्पर्धेचे निमंत्रक असून आय.एस.टी.ई. स्टुडंट चाप्टर चे अध्यक्ष आदित्य पाटील आहे.या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक द फर्न असून केआयटी-आय.आर.एफ,व्ह.एम.के. 3डी प्रिंटींग, नेक्सजन, ए.सी.प्रोफेशनल, ध्वजारंभ अॅस्ट्रो वास्तू  हे सह-प्रायोजक असणार आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes