शिक्षकांच्या अन्यायाविरोधात रोष! पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवर ‘एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेने’चा बहिष्कार
schedule13 Oct 26 person by visibility 154 categoryशैक्षणिक
🌑 १० हजार ५०० मतदार मतदानापासून दूर राहणार; प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. बापूसाहेब आडसुळ यांचा थेट इशारा
कोल्हापूर : येणाऱ्या पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसंदर्भात ‘एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना, महाराष्ट्र राज्य’ या संघटनेने अत्यंत आक्रमक पवित्रा घेत निवडणुकीवर थेट बहिष्काराची घोषणा केली आहे. संघटनेशी संबंधित सुमारे १० हजार ५०० मतदार या मतदान प्रक्रियेपासून पूर्णपणे दूर राहतील, असा थेट इशारा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. बापूसाहेब आडसुळ यांनी दिला आहे. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात आणि शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
शिक्षकांचे वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले प्रश्न, त्यांच्या रास्त व न्याय्य मागण्या आणि शिक्षण क्षेत्रातील विविध गंभीर समस्यांकडे शासन तसेच प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नसल्याची तीव्र भावना संघटनेने व्यक्त केली आहे. शिक्षकांच्या ज्वलंत प्रश्नांना योग्य न्याय मिळावा आणि त्यांच्या मागण्यांबाबत तातडीने व ठोस निर्णय व्हावेत, याच उद्देशाने हा बहिष्कार टाकण्याचा कठोर निर्णय घेण्यात आल्याचे प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. बापूसाहेब आडसुळ यांनी स्पष्ट केले
शिक्षक हा शिक्षण व्यवस्थेचा मुख्य आधारस्तंभ असतानाही त्यांच्या समस्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. शिक्षकांच्या समस्या सोडवणे ही शासन आणि संबंधित यंत्रणांची मुख्य जबाबदारी आहे. जर या मागण्यांकडे अशीच डोळेझाक केली जाणार असेल, तर संघटनेच्या माध्यमातून लोकशाही मार्गाने अधिक तीव्र आवाज उठवला जाईल, असा ठाम निर्धारही प्रा. डॉ. आडसुळ यांनी व्यक्त केला. या बहिष्कारामुळे आगामी पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे समीकरण पूर्णपणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.