SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
समरजितसिंह घाटगे यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश; भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले स्वागत अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने कोल्हापुरात १२ एप्रिल रोजी ब्राह्मण शेतकरी मेळावाजागतिक रोमा दिन: उपेक्षितांच्या अस्तित्वाचा आणि संस्कृतीचा उत्सवडीकेटीईच्या विद्यार्थ्यांचे वॉलचंद कॉलेज येथील स्ट्रक्चर मेकिंग स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षिससीपीआर रुग्णालयातील दुरुस्ती कामांना प्रारंभ; गोदावरी प्रवेशद्वार तात्पुरते बंद‘गोकुळ’चे शिल्‍पकार माजी चेअरमन स्‍व. आनंदराव पाटील-चुयेकर यांची ८८ वी जयंती गोकुळमध्‍ये साजरी...'महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम' (MRDP) राबविण्यास मंत्रिमंडळाची अधिकृत मंजुरी : आमदार राजेश क्षीरसागरबळीराजा पाणंद रस्त्यांसाठी ३० दिवसांत पाहणी व प्रस्ताव सादर करा; आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे निर्देशजनता दरबारामधील तक्रारीच्या अनुषंगाने महापौर रुपाराणी निकम यांची सुर्वे नगर परिसरात पाहणीकोल्हापुरात स्थानिक गुन्हे शाखेकडून दुचाकी चोरांची टोळी जेरबंद; १२ मोटार सायकलींसह ५ लाखांचा मुद्देमाल जप्त

जाहिरात

 

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने कोल्हापुरात १२ एप्रिल रोजी ब्राह्मण शेतकरी मेळावा

schedule08 Apr 26 person by visibility 115 categoryराज्य

कोल्हापूर: अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने कोल्हापुरात येत्या रविवार, दिनांक १२ एप्रिल रोजी भव्य ब्राह्मण शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा ताराबाई पार्क येथील मांगल्य हॉल येथे पार पडणार असून, महाराष्ट्रातील ५०० हून अधिक शेतकरी यात सहभागी होणार असल्याची माहिती शेतकरी आघाडीचे अध्यक्ष हरीश शिंदे आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष श्यामराव जोशी यांनी दिली. 

शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान आणि शासनाच्या विविध योजनांची माहिती करून देणे, हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश आहे. मेळाव्याचे उद्घाटन सकाळी १० वाजता मान्यवरांच्या हस्ते होणार असून, यावेळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंदराव कुलकर्णी, कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक, परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आशिष दामले, चितळे उद्योग समूहाचे संचालक गिरीश चितळे आणि जयदेव बर्वे यांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या मेळाव्यात शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनासाठी विविध सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रसिद्ध हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख बदलते हवामान या विषयावर, तर आर. एस. चौगले नाबार्डच्या विविध योजनांवर प्रकाश टाकतील. यासोबतच जयदेव बर्वे पॉली फॉस्फेट तंत्रज्ञानावर आणि अरविंद कुलकर्णी कुटुंब व अर्थव्यवस्था या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. विशेष म्हणजे, संयुक्त राष्ट्रसंघाने २०२६ हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केल्याच्या निमित्ताने, या मेळाव्यात १० कर्तबगार महिला शेतकऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. तसेच सुभाष जोशी यांना सहकार भूषण, तर गिरीश चितळे व जयंत बर्वे यांना समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात येईल. 

या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी विवेक जोशी, गुरुप्रसाद कुलकर्णी, आशिष आमटे, प्रमोदिनी हर्डीकर, सचिन कुलकर्णी, सचिन पितांबरे आणि उदय गोसावी विशेष परिश्रम घेत आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes