SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
समरजितसिंह घाटगे यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश; भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले स्वागत अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने कोल्हापुरात १२ एप्रिल रोजी ब्राह्मण शेतकरी मेळावाजागतिक रोमा दिन: उपेक्षितांच्या अस्तित्वाचा आणि संस्कृतीचा उत्सवडीकेटीईच्या विद्यार्थ्यांचे वॉलचंद कॉलेज येथील स्ट्रक्चर मेकिंग स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षिससीपीआर रुग्णालयातील दुरुस्ती कामांना प्रारंभ; गोदावरी प्रवेशद्वार तात्पुरते बंद‘गोकुळ’चे शिल्‍पकार माजी चेअरमन स्‍व. आनंदराव पाटील-चुयेकर यांची ८८ वी जयंती गोकुळमध्‍ये साजरी...'महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम' (MRDP) राबविण्यास मंत्रिमंडळाची अधिकृत मंजुरी : आमदार राजेश क्षीरसागरबळीराजा पाणंद रस्त्यांसाठी ३० दिवसांत पाहणी व प्रस्ताव सादर करा; आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे निर्देशजनता दरबारामधील तक्रारीच्या अनुषंगाने महापौर रुपाराणी निकम यांची सुर्वे नगर परिसरात पाहणीकोल्हापुरात स्थानिक गुन्हे शाखेकडून दुचाकी चोरांची टोळी जेरबंद; १२ मोटार सायकलींसह ५ लाखांचा मुद्देमाल जप्त

जाहिरात

 

समरजितसिंह घाटगे यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश; भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले स्वागत

schedule08 Apr 26 person by visibility 284 categoryराजकीय

मुंबई  : कागल येथील राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार गट) पक्षाचे नेते आणि शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे, त्यांचे पुत्र राजे अखिलेश सिंह, राजे विरेंद्रसिंह घाटगे, पंचायत समितीच्या सभापती सुवर्णा पाटील, उपनगराध्यक्ष जयंत रावण यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी बुधवारी भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत केले.

 भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खा.धनंजय महाडिक, राजवर्धन नाईक निंबाळकर, ज्येष्ठ नेते प्रकाश आवाडे, भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते.  

  यावेळी प्रदेशाध्यक्ष  चव्हाण यांनी सांगितले की, समरजितसिंह घाटगे यांच्या प्रवेशामुळे कोल्हापूर जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीची ताकद आणखी वाढणार आहे. भाजपाची विचारधारा गावखेड्यात नेण्यासाठी पोषक वातावरण आहे. घाटगे यांच्या नेतृत्वाखाली यापुढील काळात सर्वांनी एकदिलाने काम करायचे आहे. ज्या विश्वासाने त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे त्याला तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही  चव्हाण यांनी दिली. 

यावेळी समरजितसिंह घाटगे म्हणाले की यापुढे पक्ष सांगेल त्यानुसार चालायचे असे आम्ही ठरवले आहे. पक्षाकडून जी काही जबाबदारी सोपवली जाईल ती पार पाडण्यासाठी आम्ही जोमाने काम करून पक्षाची विचारधारा गावागावात, घराघरात पोहचवू.

 यावेळी जिल्हा परिषद सदस्या शिवानी विजयसिंह भोसले, पंचायत समिती सदस्य अनिलकुमार हेगडे,  रंजना बापू अस्वले, नगरसेवक दीपक मगर, सभापती शिक्षण समिती अरुण गुरव, महिला बालकल्याण समिती  सारिका बारड, नगरसेविका  साधना विष्णू पाटील, नगरसेवक सुशांत कालेकर, उमेश सावंत, बाळासाहेब माळी, सौ. मेघा गजानन माने, आनंदा पसारे, विजय राजगिरे, कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कृष्णात पाटील, हमिदवाडा साखर कारखान्याचे संचालक कैलाश जाधव, सरपंच संभाजी फराकटे यांनीही भाजपात प्रवेश केला.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes