SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर: एसटी प्रवाशांचे दागिने लांबवणारी सराईत महिला जेरबंद; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कारवाईकोल्हापूर : चारित्र्याच्या संशयावरून की जुना वाद? मलकापुरात मोठ्या भावाकडून सख्या भावाचा भीषण खूनमहापालिकेच्यावतीने भगवान गौतम बुध्द जयंती साजरीशिवाजी विद्यापीठात महाराष्ट्र दिन उत्साहातघुणकीत गौतम बुद्धांची २५८८ वी जयंती साजरीजागतिक चित्रपटसृष्टीचा भारतीय मानदंड: सत्यजित रायअसाही एक . . . आगळा वेगळा शाही विवाह सोहळा'आरोग्याच्या सवयी बालपणातच दृढ होतात' : स्वच्छता निरीक्षक स्वप्निल उलपे यांचे प्रतिपादनकामगारांच्या कष्टांवर महाराष्ट्राचे वैभव : मंत्री मंगलप्रभात लोढास्वगणना मोहिमेस 1 मे पासून प्रारंभ पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार शाहू छत्रपती यांनी नोंदविला आपला सहभाग

जाहिरात

 

कोल्हापूर : चारित्र्याच्या संशयावरून की जुना वाद? मलकापुरात मोठ्या भावाकडून सख्या भावाचा भीषण खून

schedule02 May 26 person by visibility 202 categoryगुन्हे

मलकापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील मलकापूर शहरात आज सकाळी एक अत्यंत थरारक आणि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील नगरपालिकेच्या इमारतीमागे सुरू असलेल्या एका खाजगी इमारत बांधकामावर काम करणाऱ्या छत्तीसगडमधील कामगाराची त्याच्याच सख्या मोठ्या भावाने डोक्यात फरशी घालून निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुण आणि त्याचा मोठा भाऊ हे दोघेही मूळचे छत्तीसगड राज्यातील असून उदरनिर्वाहासाठी मलकापूर येथे बांधकाम मजूर म्हणून काम करत होते. शुक्रवारी रात्री उशिरा या दोन भावांमध्ये कोणत्यातरी कारणावरून जोरदार खडाजंगी झाली. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संतापलेल्या मोठ्या भावाने जवळच पडलेली जड फरशी धाकट्या भावाच्या डोक्यात घातली. घाव वर्मी बसल्याने धाकट्या भावाचा जागीच मृत्यू झाला. कृत्य केल्यानंतर आरोपी भाऊ अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाला.

आज सकाळी नेहमीप्रमाणे इतर कामगार कामावर आले असता, त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह दिसून आला. ही माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरली आणि बघ्यांची मोठी गर्दी जमली. विशेष म्हणजे, गेल्या आठवड्यातही या दोन्ही भावांमध्ये तीव्र स्वरूपाचे वाद झाले होते, अशी चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये सुरू आहे.

घटनेची माहिती मिळताच शाहूवाडी पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून तो उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. आरोपी अद्याप फरार असून, त्याच्या शोधासाठी पोलिसांनी विशेष पथके रवाना केली आहेत. कौटुंबिक वाद की अन्य काही कारण, याचा शोध पोलीस घेत असून लवकरच आरोपीला जेरबंद करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes