SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
'स्ट्रोक' रुग्णांसाठी " रिमोट रोबोटिक न्यूरोइंटरव्हेन्शन” प्रकल्पाचा प्रस्ताव सादर करण्याच्या आरोग्यमंत्र्याच्या सुचनारोटरी क्लब कोल्हापूर हेरिटेज आणि आरसीकेओपी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गरजू महिलांना पिंक रिक्षा वाटपअर्थशास्त्र अधिविभागात माजी विद्यार्थी मेळावाकामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसाठी ‘POSH’ कायद्याची कडक अंमलबजावणी; राज्यभर तपासणी मोहीमगांधीनगर येथे तंबाखूविरोधी धडक मोहीम ; २७ जणांवर कारवाई डी. वाय. पाटील फिजिओथेरपीला सलग दुसऱ्यांदा सर्वसाधारण विजेतेपदकेंद्र सरकारच्या ऊस नियंत्रण धोरणाविरोधात जय शिवराय किसान संघटनेची कोल्हापुरात पत्रकार परिषद; नवीन कायद्यावर कडाडून टीकाधक्कादायक! 'तो' कुटुंबासह कोकण दर्शनाला गेला अन मागे मित्रानेच लुटले घर; कोल्हापुरात १५ लाखांच्या दागिन्यांसह एक गजाआडडीकेटीईच्या विद्यार्थ्यांची हरियाणा येथील बूटकॅम्पमध्ये चमकदार कामगिरीराष्ट्रीय डेंग्यू दिवस: जनजागृती आणि सतर्कतेची गरज

जाहिरात

 

कोल्हापूर: एसटी प्रवाशांचे दागिने लांबवणारी सराईत महिला जेरबंद; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कारवाई

schedule02 May 26 person by visibility 284 categoryगुन्हे

कोल्हापूर : एसटी बसमध्ये चढताना प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन दागिने लंपास करणाऱ्या एका सराईत महिला चोरटीला अटक करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे. पोलिसांनी या महिलेकडून चोरीच्या दोन गुन्ह्यांतील तब्बल ४ लाख ७४ हजार ९०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत.


कागल तालुक्यातील मुदाळतिठ्ठा येथे १७ एप्रिल २०२६ रोजी बसमध्ये चढत असताना एका ज्येष्ठ महिला फिर्यादीची पर्स अज्ञात चोरट्याने लांबवली होती. या घटनेचा तपास करत असताना पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव आणि त्यांच्या पथकाला माहिती मिळाली की, एक महिला चोरीचे दागिने विकण्यासाठी हुपरी येथील एका सुतगिरणीजवळ येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून कामिना प्रकाश चौगुले (वय ४०, रा. शाहूनगर, कागल) या महिलेला ताब्यात घेतले. तिची झडती घेतली असता, तिच्याकडे ४०.५२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने (एक मोहनमाळ व मंगळसूत्र) सापडले.

संबंधित महिला आरोपीने मुरगूड पोलीस ठाण्यातील चोरीच्या दोन गुन्ह्यांची कबुली दिली आहे. कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक  नीलोत्पल आणि अपर पोलीस अधीक्षक  बी. धीरजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण व त्यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली. आरोपी महिलेला मुद्देमालासह पुढील कारवाईसाठी मुरगूड पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes