केजरीवालांसाठी सीएम आतिशी यांनी खुर्ची रिकामी ठेवली; हा संविधानाचा अपमान भाजपाची टिका
schedule23 Sep 24 person by visibility 306 categoryदेश
नवी दिल्ली. दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री आतिशी यांनी राजधानी दिल्लीचा पदभार स्वीकारताच मोठी घोषणा केली आहे. अरविंद केजरीवाल यांच्यासाठी मुख्यमंत्रीपद रिक्त ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
त्याचवेळी दिल्ली भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी 'आप'वर निशाणा साधत हा घटनेचा अपमान असल्याचे म्हटले आहे.
या खुर्चीवर फक्त अरविंद केजरीवालच बसतील, असे आतिषी सांगतात. त्या म्हणाल्या की केजरीवाल पुन्हा दिल्लीचे मुख्यमंत्री होतील आणि त्यानंतर अरविंद केजरीवाल या खुर्चीवर बसतील.