SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
छत्रपती शाहू वैद्यकीयनगरी वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मुलांसाठी तयार : मंत्री, हसन मुश्रीफपश्चिम महाराष्ट्रातील सर्वात भव्य "सतेज कृषी प्रदर्शनात चार दिवसात ९ कोटींची उलाढाल, तांदळासह अन्य धान्याची उच्चांकी विक्री‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उपक्रमांतर्गत शिवाजी विद्यापीठात ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटनडी. वाय पाटील मेडिकल संघाला विजेतेपद; डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धाकोल्हापूर महापालिकेची उद्याने 31 डिसेंबर रोजी रात्रौ 12 वाजेपर्यंत राहणार खुलीप्रथम कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादनशैक्षणिक धोरण व पायाभूत शिक्षणाची भूमिका आजऱा तालुक्यातील दुर्घटना : परोली बंधाऱ्यात बुडून तिघांचा मृत्यूनामदार चंद्रकांतदादा पाटील यांचे करवीर नगरीत स्वागतकोल्हापुरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मृती, स्फुर्ती सदन होणार

जाहिरात

 

डीकेटीईची टीम इनोव्हेटर्सची चेन्नई येथील देशपातळीवरील डीझाईन स्पर्धेत तृतीय क्रमांकाने सन्मान

schedule20 Dec 24 person by visibility 180 categoryशैक्षणिक

इचलकरंजी : डीकेटीईच्या टेक्स्टाईल ऍन्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट, इचलकरंजी मधील मेकॅनिकल विभागातील टीम इनोव्हेटर्स संघातील विद्यार्थी प्रथमेश कदम, तुषार धुळूबुळू, विश्‍वराज पाटील व प्रथमेश शेंडगे यांनी राष्ट्रीय स्तरावरील आयोजित एसआरएम, आयएसटी, चेन्नई आयोजित प्रतिष्टित एसएई इंडिया सदर्न सेक्शन एनएलसीईडी २०२४ संपन्न झालेल्या इंजिनिअरींग डिझाईनमधील स्पर्धेत सहभाग घेवून चमकदार कामगिरी करुन देशपातळीवरील स्पर्धेत तृतीय क्रमांकाचे स्थान  पटकविले आहे.

विद्यार्थ्यांनी प्रा. जी. सी. मेकळके व प्रा. आर. डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विषेश गरजा असलेल्या व्यक्तींसाठी सुलभता सुधारण्याच्या उददेशाने मायक्रो मोबिलिटी सोल्यूएशन डिझाईन याचे सादरीकरण केले. ही स्पर्धा चेन्नई येथील एसआरएम, आयएसटी, येथे संपन्न झाली या स्पर्धेमध्ये इन्व्होवेशन, नाविण्यपूर्ण डिझाईन आणि अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्याद्वारे वास्तविक जगातील अव्हानांवर उपाययोजना या संकल्पनेवर आधारित सादरीकरण करण्यात आले. या स्पर्धेत देशभरातील १०० हून अधिक अभियांत्रिकी महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. या पैकी टीम इनोव्हेटर्सने या स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकविला.

या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण कल्पना शोधल्या, उदयोजकीय कौशल्यांचा सन्मान केला आणि समविचारी व्यक्तींशी विविध विषयांवर उहापोह करण्यात आला याचा फायदा विद्यार्थ्यांना भविष्यातील शैक्षणिक क्षेत्रातील नाविन्यपूर्ण संशोधन करण्यास होणार आहे. डीकेटीई मध्ये उपलब्ध असलेली आयडिया लॅब, इन्व्होवेश आणि स्टार्ट अप कटटा तसेच डीकेटीईतील विविध अधुनिक लॅबमार्फत विद्यार्थ्यांना विविध संशोधनाचे मार्गदर्शन केले जाते यामुळे अशा स्पर्धेत यश प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांना या लॅबमधील सुविंधाचा लाभ होतो व देशापातळीवरील या स्पर्धेत आपली गुणवत्ता त्यांनी सिध्द केली.

संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, उपाध्यक्ष आमदार प्रकाशआण्णा आवाडे, मानद सचिव डॉ सपना आवाडे, रवी आवाडे व सर्व विश्‍वस्त यांनी विद्यार्थ्यांच्या भावी कार्यास शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना संस्थेच्या संचालिका प्रा.डॉ.सौ.एल.एस.आडमुठे, डे. डायरेक्टर डॉ यु.जे.पाटील, विभागप्रमुख डॉ व्ही. आर. नाईक यांचे मार्गदर्शन लाभले.

जाहिरात

 
Copyright © 2024. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes