सोशल मीडियाच्या काळात कॅमेरा तंत्र आवश्यक : सुधीर बोरनाक; डॉ. ग. गो. जाधव अध्यासनात कार्यशाळा
schedule24 Dec 25 person by visibility 47 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : सोशल मीडियाच्या काळात कॅमेऱ्याचे महत्व नव्याने अधोरेखित होत आहे. त्यामुळे कॅमेरा तंत्रात नव्याने झालेले बदल शिकून घेणे आवश्यक असल्याचे मत कॅमेरा प्रशिक्षक सुधीर बोरनाक यांनी व्यक्त केले. शिवाजी विद्यापीठात पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनाच्या वतीने आयोजित फोटोग्राफी कार्यशाळेत ते बोलत होते.
याप्रसंगी बोरनाक यांनी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून कॅमेऱ्याच्या विविध फीचर्सची माहिती दिली. सोबतच विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. विद्यार्थ्यांनी यावेळी बोरनाक यांच्याकडून हँडस ऑन ट्रेनिंग घेतले.
यावेळी अध्यासनाच्या ऑनलाइन जर्नालिझम, फोटोग्राफी, शॉर्ट फिल्म मेकिंग तसेच एम. ए. मास कम्युनिकेशन, बी.ए.फिल्म मेकिंग विभागाचे विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी अध्यासनाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी स्वागत व प्रास्ताविक करताना, थेअरी सोबत प्रॅक्टिकलचे महत्व समजावून सांगितले. बोरनाक यांचे स्वागत डॉ. सुमेधा साळुंखे यांनी केले. सूत्रसंचालन व आभार जयप्रकाश पाटील यांनी मानले. यावेळी बी.ए. फिल्म मेकिंगचे शिक्षक अनुप जत्राटकर उपस्थित होते.





