SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कर्मचाऱ्यांचा सन्मान संस्थेला पुढे नेणारा : डॉ. वेदप्रकाश मिश्रा; ‘प्रेसिडेंट एक्सलन्स अवॉर्ड’ कार्यक्रम उत्साहत रेकॉर्डवरील दुचाकी चोरट्याला अटक; 34 मोटार सायकली जप्त; स्थानिक गुन्हे अन्वेषण कोल्हापूर शाखेची कारवाईकोल्हापूर : मतमोजणी केंद्रांची जिल्हाधिकारी अमोल येडगे, प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांच्याकडून पाहणीनगरपरिषदा/नगरपंचायतींसाठी लागू असलेली आदर्श आचारसंहिता समाप्तइंडियन मिलिटरी अकॅडमीच्या ९३ वर्षांच्या इतिहासात प्रथमच टेरिटोरियल आर्मीमधून पास आऊट होणारी पहिली महिला लेफ्टनंट सई जाधव यांचा संजय घोडावत शैक्षणिक संकुलात सन्मानपूर्वक गौरव'आप' इंडिया आघाडीतून बाहेर, कोल्हापूर महापालिका निवडणुकीत स्वतंत्र लढणारसरनोबतवाडीत गॅरेजना आग... सुमारे पस्तीस लाखाचे नुकसानकोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या समन्वयासाठी पोलिस प्रशासन, महापालिका व‍ नियुक्त कर्मचा-यांचे प्रशिक्षण विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभानिमित्त उद्या ग्रंथदिंडी; ग्रंथमहोत्सवाचे होणार उद्घाटनसोलापूर येथील आंतरराष्ट्रीय रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत ऋषिकेश कबनुरकरचे यश

जाहिरात

 

कोल्हापूर : मतमोजणी केंद्रांची जिल्हाधिकारी अमोल येडगे, प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांच्याकडून पाहणी

schedule23 Dec 25 person by visibility 56 categoryराज्य

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025-26 च्या अनुषंगाने आज शासकीय धान्य गोदाम येथील मतमोजणी केंद्राची जिल्हाधिकारी अमोल येडगे व प्रशासक तथा मुख्य निवडणूक अधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी संयुक्तपणे पाहणी केली. येत्या 15 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या निवडणूक प्रक्रियेनंतर पार पडणाऱ्या मतमोजणीच्या अनुषंगाने ही पाहणी करण्यात आली.

निवडणूक प्रक्रियेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी 14 भरारी पथके (FST), 39 स्थिर पथके (SST) तसेच 7 व्हिडीओ पडताळणी पथके (VST) नियुक्त करण्यात आली असून त्यांचे कामकाज सुरू झाले आहे. आजपासून नामनिर्देशन पत्रांची विक्री तसेच नामनिर्देशन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या निवडणुकीसाठी शहरात एकूण 584 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.

मतमोजणी प्रक्रिया शासकीय धान्य गोदाम येथे पाच निवडणूक निर्णय अधिकारी तसेच राजारामपुरी येथील व्ही. टी. पाटील हॉल येथे दोन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात पार पडणार आहे. शहरात एकूण 4,94,711 मतदार असून त्यामध्ये 2,44,734 पुरुष मतदार, 2,49,940 महिला मतदार तसेच 37 इतर मतदारांचा समावेश आहे.

मतमोजणी केंद्राच्या पाहणी दरम्यान जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी स्ट्राँग रूम व मतमोजणी कक्षासाठी आवश्यक सुरक्षितता उपाययोजना, अंतर्गत रचना व व्यवस्थापनाबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सविस्तर सूचना दिल्या. प्रभागनिहाय मतमोजणीची व्यवस्था, टेबल मांडणी, मनुष्यबळ नियोजन तसेच अधिकारी व उमेदवार प्रतिनिधींसाठी बैठक व्यवस्थेचा यावेळी आढावा घेण्यात आला. त्यानंतर राजारामपुरी येथील व्ही. टी. पाटील सभागृहात उभारण्यात येणाऱ्या स्ट्राँग रूम व मतमोजणी कक्षाचीही पाहणी करण्यात आली. मतमोजणी प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक व वेळेत पार पडावी, यासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.

यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उपजिल्हाधिकारी डॉ. संपत खिलारी, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) स्वाती गायकवाड, उपआयुक्त परितोष कंकाळ, तहसीलदार स्वप्निल पोवार, शहर अभियंता रमेश मस्कर, उपशहर अभियंता निवास पोवार, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, मुख्य जयवंत पोवार, सहाय्यक विद्युत अभियंता अमित दळवी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes