SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
किणी वडगाव येथील जबरी चोरीचा गुन्हा "12 तासात उघड" सात आरोपी ताब्यातकर्मचाऱ्यांचा सन्मान संस्थेला पुढे नेणारा : डॉ. वेदप्रकाश मिश्रा; ‘प्रेसिडेंट एक्सलन्स अवॉर्ड’ कार्यक्रम उत्साहत रेकॉर्डवरील दुचाकी चोरट्याला अटक; 34 मोटार सायकली जप्त; स्थानिक गुन्हे अन्वेषण कोल्हापूर शाखेची कारवाईकोल्हापूर : मतमोजणी केंद्रांची जिल्हाधिकारी अमोल येडगे, प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांच्याकडून पाहणीनगरपरिषदा/नगरपंचायतींसाठी लागू असलेली आदर्श आचारसंहिता समाप्तइंडियन मिलिटरी अकॅडमीच्या ९३ वर्षांच्या इतिहासात प्रथमच टेरिटोरियल आर्मीमधून पास आऊट होणारी पहिली महिला लेफ्टनंट सई जाधव यांचा संजय घोडावत शैक्षणिक संकुलात सन्मानपूर्वक गौरव'आप' इंडिया आघाडीतून बाहेर, कोल्हापूर महापालिका निवडणुकीत स्वतंत्र लढणारसरनोबतवाडीत गॅरेजना आग... सुमारे पस्तीस लाखाचे नुकसानकोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या समन्वयासाठी पोलिस प्रशासन, महापालिका व‍ नियुक्त कर्मचा-यांचे प्रशिक्षण विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभानिमित्त उद्या ग्रंथदिंडी; ग्रंथमहोत्सवाचे होणार उद्घाटन

जाहिरात

 

कर्मचाऱ्यांचा सन्मान संस्थेला पुढे नेणारा : डॉ. वेदप्रकाश मिश्रा; ‘प्रेसिडेंट एक्सलन्स अवॉर्ड’ कार्यक्रम उत्साहत

schedule23 Dec 25 person by visibility 112 categoryशैक्षणिक

▪️डी. वाय. पाटील ग्रुपच्यावतीने १०७ कर्मचारी संस्थांचा गौरव 
 कोल्हापूर  : उत्कृष्ट कार्याचा सन्मान म्हणजे केवळ आपण मिळवलेल्या यशाचे कौतुक नसून,  भविष्यात अधिक चांगले काम करण्याचे उत्तरदायित्व आपल्यावर आले आहे. कर्मचाऱ्यांचा  सन्मान हा संस्थेलाही प्रगतिपथावर नेणारा असतो.  त्यामुळे सत्कार मूर्तींनी यापुढे आणखी जबाबदारीने काम करून संस्थेचा लौकिक अधिक वाढवावा असे आवाहन जेष्ठ शिक्षण तज्ञ आणि दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च चे प्र- कुलपती आणि मुख्य सल्लागार डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी केले.   

डी. वाय. पाटील ग्रुपच्या वतीने आयोजित ‘प्रेसिडेंट एक्सलन्स अवॉर्ड २०२५’  सन्मान सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मिश्रा यांनी मार्गदर्शन केले.  डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्याला डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त आणि पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. राकेश कुमार शर्मा, डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अनिल कुमार गुप्ता आदी व्यासपीठावर उपस्थित होते. 

या पुरस्कार सोहळ्यात डी. वाय. पाटील ग्रुपमधील विविध संस्थासाठी उत्कृष्ट मानांकने, पुरस्कार, मिळवणाऱ्या संस्था, संशोधनात्मक काम, रिसर्च पेपर्स, पेटंट, विविध संस्थाकडून निधी मिळवणारे अधिकारी, कर्मचारी, संस्थाना १०७ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. 

डॉ. मिश्रा म्हणाले, कोणत्याही संस्था केवळ भव्य इमारतींनी नव्हे,  तर तेथे काम करणाऱ्या माणसांमुळे उभ्या राहतात, मोठ्या होतात. कर्मचाऱ्यांच्या मेहनत व योगदानामुळे संस्थांचा  विकास होतो. त्यामुळे संस्थेच्या विकासात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्याचा सन्मान करण्याचा डॉ. संजय डी. पाटील यांचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. 

सर्वोत्तम कामासाठी आपला गौरव झाला. पण येथे थांबू नका.  आपल्या सर्वांसाठी सर्वोत्तमपेक्षाही  अधिक चांगले शोधण्याचा नवा प्रवास येथून सुरु करा. असे आवाहन करतानाच जी संस्था  गुणवत्ता, सर्जनशीलता आणि करुणेचा सन्मान करते ती  संस्था नेहमीच मोठी होते असे त्यांनी सांगितले . 

डॉ. संजय डी. पाटील यांनी डी वाय पाटील शैक्षणिक संस्था, इतर संस्था यांच्या माध्यमातून आजवर करण्यात आलेल्या यशस्वी कामगिरीचा आढावा घेतला. जगभर डी. वाय. पी. चे विद्यार्थी नाव मोठे करत असल्याचे पाहून अभिमान वाटतो. विविध संस्थांची  दूरदृष्टि  सर्व प्राध्यापक  आणि कर्मचाऱ्यांच्या योगदानामुळेच ग्रुपने मोठी प्रगती केली आहे.  आपल्या कष्टामुळे ग्रुप यशस्वी वाटचाल करत आहे. संस्थेत सुरू असलेले संशोधन कार्य, उत्कृष्ट काम या सर्वांबद्दल कौतुक करण्यासाठी हा सोहळा आयोजित केला. यापुढेही  आणखी चांगले काम करून जगातील 500 विद्यापीठांच्या गुणवत्तेमध्ये आणण्यासाठी सर्व घटकांनी योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी केले. 

विश्वस्त ऋतुराज पाटील म्हणाले , डी  वाय  पाटील  ग्रुप हे फक्त शब्द नाहीत  तर एक ताकद आहे, ऊर्जा आहे.  सर्व क्षेत्रात चांगले काम सुरू आहे. आपण अजून चांगले  काम कसे  करू शकतो यावर भर द्यावा. आपल्या विद्यापीठाने उद्योग क्षेत्राला मार्गदर्शन केले पाहिजे  असे काम सर्वांनी करावे असे आवाहन त्यांनी केले.

विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांनी पुरस्कार  मिळवणाऱ्या सर्वांचे अभिनंदन करत नियोजनासाठी योगदान देणाऱ्या सर्वांचे आभार मानले. डॉ. राधिका ढणाल आणि डॉ. रेणुका तुरंबेकर यांनी सूत्रसंचालन केले. 

प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी पुरस्कार्थीच्या वतीने मनोगत व्यक केले. सर्वच अधिकारी व कर्मचारी अधिकाधिक योगदान देऊन संस्थेच्या विकासात योगदान देतील अशी ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी  पूजा ऋतुराज पाटील,  वृषाली पृथ्वीराज पाटील, सी.एच. आर. ओ. श्रीलेखा साटम, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, डॉ. जे. ए. खोत यांच्यासह विविध संस्थांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes