महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचा जयघोष, शेकडो समर्थकांच्या सहभागाने सत्यजित जाधव यांच्यासह महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ फेरी, खासदार धनंजय महाडिक यांचा सहभाग
schedule07 Jan 26 person by visibility 258 categoryराजकीय
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक प्रभाग क्रमांक 11 च्या महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ राजाराम चौक, टिंबर मार्केट, वारे वसाहत परिसरामध्ये महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचा जयघोष, पारंपारिक वाद्याचा नाद, शेकडो समर्थकांच्या उस्फूर्त सहभागाने प्रचार फेरी पार पडली. या प्रचार फेरीमध्ये खासदार धनंजय महाडिक सहभागी झाले होते.
प्रभाग क्रमांक 11 मध्ये शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार सत्यजित चंद्रकांत जाधव, निलांबरी गिरीश साळुंखे, यशोदा प्रकाश मोहिते, माधुरी किरण नकाते हे निवडणूक लढवत असून त्यांच्या प्रचारार्थ आज प्रचार फेरी काढण्यात आली. ही प्रचार फेरी राजाराम चौक गंजीमाळ, लाड चौक, मंगळ पेठ राम गल्ली, शाहू बँक, वारे वसाहत, पाण्याचा खजिना, टिंबर मार्केट मार्गे राजाराम चौकात या पदयात्रेचा समारोप झाला. या पदयात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी महायुतीच्या उमेदवारांच्या समर्थनात घोषणा देण्यात आल्या या रॅलीमध्ये खासदार धनंजय महाडिक ही सहभागी झाले होते.
महायुतीच्या उमेदवारांना मतदारांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शिवसेना महायुतीचे उमेदवार सत्यजित चंद्रकांत जाधव यांच्याबाबत दीपक पाटील म्हणाले प्रभाग क्रमांक ११ मधून सत्यजित जाधव हे शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. घरचा राजकीय आणि सामाजिक वारसा लाभला आहे. पूर्वी कै. आमदार चंद्रकांत जाधव , जयश्री जाधव यांच्या माध्यमातून विकास कामे झाली आहेत. हाच वारसा पुढे चालवण्यासाठी सत्यजित जाधव हे निवडणुकीस उभारले असून ते नक्की विजय होतील. त्यांच्या कार्यातून प्रभागाचा चेहरा मोहरा नक्की बदलेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
तसेच सविता सोलापूर म्हणाल्या सत्यजित जाधव यांचे वडील व आई दोघेही आमदार होते या काळात त्यांनी चांगली कामे केली आहेत. हाच वारसा पुढे चालवण्यासाठी सत्यजित जाधव यांना लोक निवडून देतील. तसेच महिलांसाठी व्यवसायिक प्रशिक्षण ही त्यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून झाले आहेत. यामुळे विधायक कामासाठी लोक त्यांना नक्की निवडून देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या फेरीमध्ये मोठ्या प्रमाणात महिला, समर्थक सहभागी झाल्या होत्या.

