ओंकार जाधव यांच्या प्रचारार्थ सिरत मोहल्ला परिसरामध्ये प्रचार फेरी
schedule07 Jan 26 person by visibility 202 categoryराजकीय
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक प्रभाग क्रमांक 13 मध्ये शिवसेना महायुतीचे उमेदवार ओंकार जाधव यांच्या प्रचारार्थ सिरत मोहल्ला परिसरामध्ये प्रचार फेरी काढण्यात आली. त्या उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
प्रभाग क्रमांक 13 मध्ये घरोघरी भेटी देऊन प्रचार केला जात आहे त्यास खूप चांगला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. तसेच वडील संभाजी जाधव यांच्या कार्यामुळे ही मतदारांमध्ये सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे प्रभाग क्रमांक 13 चे शिवसेना महायुतीचे उमेदवार ओमकार जाधव यांनी सांगितले.
या प्रचार फेरीमध्ये महिला सहभागी झाल्या होत्या. यावेळी मतदारांना भेटून महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.

