डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग इनोव्हर्स २.० राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम
schedule31 Dec 25 person by visibility 81 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : बेळगावी येथे झालेल्या इनोव्हर्स २.० स्पर्धेत डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट च्या विद्यार्थ्यांनी प्रथम स्थान मिळवत देदीप्यमान यश मिळवले आहे.
बेळगावी येथील के. एल. एस. गोगटे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे झालेल्या इनोव्हर्स २.० या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत देशभरातील ५६ संघांनी सहभाग घेतला होता. यामध्ये
डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीचे स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटचे एमसीए विद्यार्थी प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले.
या स्पर्धेत “AI-Driven Customer Churn Prediction & Personalized Retention Engine” या त्यांच्या प्रकल्पाने विशेष दाद मिळवली. या संघात केदार दुरुगडे, प्रथमेश भोसले व आदित्य जाधव यांचा समावेश होता.
या यशाबद्दल डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा आणि रजिस्ट्रार डॉ. व्ही. व्ही. भोसले यांच्या हस्ते त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले. त्यांना संचालक डॉ. अजित एस. पाटील, विभागप्रमुख डॉ. एस. एस. गुळवणी, समन्वयक प्राध्यापक डॉ. व्ही. आय. पुजारी यांचे मार्गदर्शन लाभले.
या निवडीबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे कुलपती डॉ संजय डी पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी अभिनंदन केले.





