डॉ. पद्मा रेखा शिशिर जिरगे यांना दुहेरी आंतरराष्ट्रीय सन्मान
schedule31 Dec 25 person by visibility 93 categoryआरोग्य
कोल्हापूर : येथील डॉ. पद्मा रेखा शिशिर जिरगे यांची फर्टिलिटी अँड४ रिप्रोडक्शन या नियतकालिकाच्या मुख्य संपादक (Editor-in-Chief) म्हणून नियुक्ती झाल्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा सन्मान मिळाला आहे. हे नियतकालिक Asia Pacific Initiative on Reproduction चे अधिकृत जर्नल असून ग्लोबल साउथमधील सर्वाधिक प्रतिष्ठित नियतकालिकांपैकी एक आहे.
फर्टिलिटी अँड रिप्रोडक्शन या नियतकालिकाला जागतिक स्तरावर मोठा वाचकवर्ग असून पुनरुत्पादन वैद्यकशास्त्रातील दर्जेदार संशोधन प्रकाशित केले जाते. मध्य पूर्व, दक्षिण व आग्नेय आशिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, जपान आणि चीन अशा विस्तृत आशिया-पॅसिफिक प्रदेशातील संशोधन या जर्नलमध्ये समाविष्ट असते.
डॉ. जिरगे १ जानेवारी २०२६ पासून अधिकृतपणे ही जबाबदारी स्वीकारणार आहेत. यापूर्वी त्यांनी Indian Society of Assisted Reproduction च्या Journal of Human Reproductive Sciences या नियतकालिकाच्या मुख्य संपादक म्हणून कार्य केले असून त्यानंतर फर्टिलिटी अँड रिप्रोडक्शनच्या उपसंपादक (Deputy Editor) म्हणूनही त्यांनी काम केले आहे.





