SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
घुणकीत वंचितचे नेते ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस 'स्वाभिमानी दिवस' उत्साहात साजराकोल्हापूर: उसाच्या शेतातून अडीच लाखांचा गांजा जप्त; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाईकागलमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण वूलू स्वच्छतागृह महिला भाविकांसाठी आधारवड, मातृ दिनाचे औचित्य साधून भाजपची कोल्हापूरकरांना अनोखी भेट : भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक म्युझिकल फौंऊटेनच्या कामात कोणतीही तडजोड नको : आमदार राजेश क्षीरसागरमातृत्वाची महानता: आईच्या अपार मायेचा उत्सवथलपति विजय यांच्या राजकीय पर्वाचा भव्य श्रीगणेशा; समर्थकांच्या जनसागरासमोर घेतली निष्ठेची शपथ!महिला व बाल विकास विभागातील बदल्या आता केंद्रित ऑनलाइन पद्धतीनेजागतिक ल्युपस दिन: एक अदृश्य लढाई आणि जनजागृतीचा संकल्परायगड जिल्ह्यातील वादळी वाऱ्यांचा फटका बसलेल्या नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत द्यावी

जाहिरात

 

घुणकीत वंचितचे नेते ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस 'स्वाभिमानी दिवस' उत्साहात साजरा

schedule10 May 26 person by visibility 110 categoryसामाजिक

कोल्हापूर : येथील वंचित बहुजन आघाडी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने सिद्धार्थ नगर व डॉ. आंबेडकर नगर येथे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांचा ७२ वा वाढदिवस 'स्वाभिमानी दिवस' म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने केवळ जल्लोष न करता समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भव्य आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर आणि मोफत डोळे तपासणी अशा विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष जनार्दन गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी मार्गदर्शन करताना गायकवाड म्हणाले की, "ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांची राजकारणातील भूमिका ही देशाला प्रगतीच्या दिशेने नेणारी आणि समाज जोडणारी आहे. देशाला सध्या त्यांच्या विचारांच्या प्रकाशाची गरज असून, त्यांचे हात बळकट करणे हे आपले कर्तव्य आहे." त्यांनी साहेबांना उत्तम आरोग्य लाभो, अशी सदिच्छाही व्यक्त केली.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले वारणा दूध संघाचे संचालक राजवर्धन मोहिते यांनी उत्सव समितीच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. "सध्याच्या काळात अशा लोकोपयोगी आरोग्य शिबिरांची नितांत गरज आहे," असे प्रतिपादन त्यांनी केले. या शिबिरासाठी संजीवन ब्लड बँक, जानकी दवाखाना आणि यशोदीप हॉस्पिटलचे सहकार्य लाभले. ग्रामपंचायत सदस्य संदीप केर्ले यांनीही कार्यक्रमाला उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

हा सोहळा यशस्वी करण्यासाठी उत्सव समितीचे प्रमुख सचिन कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश कांबळे, सचिव गौतम कांबळे, सुभाष कांबळे, बाळासो कांबळे, विकास कांबळे, जितेंद्र कांबळे, तसेच अंबपचे दत्ता गायकवाड, सुशांत पाटोळे, अशोक पाटोळे, सुनील कांबळे, उदय कांबळे व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. परिसरातील नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घेतला.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes