SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट; 'या' विषयावर सकारात्मक चर्चाआयआयसीटी फिल्‍म सिटीत जागा देणार, केंद्र सरकारकडून ४०० कोटी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहितीस्वयंपूर्ण होण्यासाठी पुनर्वसन केंद्रातून मुला-मुलींना चांगल्या सेवा आणि शिक्षण द्या : जिल्हाधिकारी अमोल येडगेसार्वजनिक वाचनालय, ग्रंथालयासाठी दर्जेदार दिवाळी अंक, कवितासंग्रह, कथासंग्रह भेट देणार : डॉ. सुनीलकुमार सरनाईकअंबाई टॅंकची दुरुस्ती करा : 'आप'चे अतिरिक्त आयुक्तांना निवेदन उचगाव येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा उत्साहात ‘टेक्नोवा’ सारख्या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला चालना : उद्योजक सारंग जाधव; डी. वाय पाटील पॉलिटेक्निकमध्ये आयोजन जिल्ह्यातील तीन लाख मुलींना एचपीव्ही लस देण्यासाठी नियोजन करा : मंत्री, हसन मुश्रीफहोळी : आनंद, सौख्य, उत्साहपूर्ण सणपालकांनी आपल्या पाल्याची आरोग्य तपासणी करुन घ्यावी : जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख

जाहिरात

 

कोल्हापूर महानगरपालिका : मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार, अधिक्षक मारुती मधाळे, आरोग्य निरिक्षक आनंदा बावडेकर निलंबीत

schedule14 Feb 25 person by visibility 601 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर  : शहरामध्ये साफसफाई करणे, कचरा उठाव करणे, कचरा प्रक्रियेवर नियंत्रण ठेवणे, कर्मचाऱ्यांमार्फत कचरा जाळणे, ॲटो टिप्पर नियोजनासाठी उपस्थित न राहिल्याने स्वच्छता विभागाकडील कामकाजामध्ये अक्षम्य निष्काळजीपणा केलेने मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार यांच्यावर आज निलंबनाची कारवाई प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी केली आहे. त्याचबरोबर आज सकाळी बुध्द गार्डन येथे प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी सकाळी 6.00 वाजता समक्ष पाहणी केली असता याठिकाणी मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार हे उपस्थित नव्हते. तसेच सर्व ॲटो टिप्पर 6 वाजता गेटच्या बाहेर पडण्याची जबाबदारी मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार, अधिक्षक मारुती मधाळे व आरोग्य निरिक्षक आनंदा बावडेकर यांचेवर असतानाही त्या बाहेर न पडलेने व स्वत: वर्कशॉपमध्ये उपस्थित नसलेने त्यांच्यावर प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी ही कारवाई केली आहे. त्याचबरोबर या पाहणीवेळी प्रशासकांना 6.15 पर्यंत 28 ॲटो टिप्पर जागेवर थांबून राहिलेचे निदर्शनास आले.

  तसेच शहर समन्वयक हेमंत काशीद व मेघराज चडचणकर यांच्याकडे महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य स्वच्छता विभागाकडे शहर समन्वयक या अत्यंत महत्वाच्या व जबाबदारी दिलेली आहे. शहरातील दैनंदिन साफसफाई करीत असताना कार्यरत आरोग्य निरीक्षक, मुकादम, सफाई कामगार यांचेकडून सफाई केले नंतर कचरा जाळला जाण्याचे प्रकार वारंवार निदर्शनास येत आहेत. यापूर्वी अशा प्रकारे कचरा न जाळणे बाबत आदेश, परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहेत. परंतू  शहर समन्वयक या नात्याने शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सर्व सफाई कर्मचारी, मुकादम याना कचरा न जाळणं तसेच ओला व सुका कचरा याचे वर्गीकरण व इतर बाबी बाबत माहिती देऊन त्यांचेमध्ये जागरुकता निर्माण करणे आवश्यक होते. तसेच आज दिनांक १४ फेब्रुवारी २०२५ रोजी स.६ वाजता बुध्दगार्डन येथे अॅटो टिप्पर पार्किंग ठिकाणी अचानक तपासणी केली असता तुम्ही टिप्पर नियोजनासाठी उपस्थित नसलेने तसेच अॅटो टिप्पर हे सकाळी ६.०० वा. पर्यंत वर्कशॉपमधून बाहर पडून त्यांना नेमून दिलेल्या भागामध्ये जाणे आवश्यक असतांना सकाळी ६.१५ वा पर्यंत २८ टिप्पर थांबून असलेचे निदर्शनास आलेने शहर समन्वयक हेमंत काशीद व मेघराज चडचणकर यांना रक्कम रुपये ५०००/- इतका दंड करण्यात आला आहे. तसेच शहरातील सफाई कचऱ्याबाबत पत्रकारांच्या ग्रुपवर पोस्ट करण्यात आलेली होती. सदर पोस्टबाबत आज दि.14 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत कोणताही खुलासा करण्यात आला नसलेचे निदर्शनास आलेने जनसंपर्क अधिकारी मोहन सुर्यवंशी यांना रु.3000/- दंड करण्यात आला आहे.

त्याचबरोबर वाय पी पोवार नगर ते जवाहरनगर मुख्य रस्ता, शाहू मित्रमंडळ येथील नार्वेकर मार्केटजवळ व माजी आमदार जयश्री जाधव यांच्या निवास स्थानाकडे जाणाऱ्या रस्तेकडेला कचऱ्याचे ढिग साचल्याचे निदर्शनास आल्याने आरोग्य निरिक्षक शर्वरी कांबळे यांना रु.1500/- व मुकादम प्रफुल्ल आयवाळे, सागर बुचडे, संग्राम कांबळे यांना प्रत्येकी रु.500/- इतका दंड करण्यात आला आहे.

  मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार यांना सेवेतून निलंबित करण्यात आलेने मुख्य आरोग्य निरिक्षक पदाचा कार्यभार पशुवैद्यकिय अधिकारी डॉ.विजय पाटील यांच्याकडे कामकाजाचे सोईस्तव अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes