SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
सीपीआर मध्ये नोकरीचे अमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या समाज माध्यमावरील पोस्ट, बातमीवर विश्वास ठेऊ नका : जिल्हाधिकारी अमोल येडगे‘गोकुळ’चे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांना अर्थशास्त्र विषयात पीएच.डी. पदवी प्रदानमाध्यमांनी बातमीस सनसनाटी स्वरुप देणे टाळावे : उपमुख्यमंत्री अजित पवारराष्ट्रध्वजासाठी प्लास्टिकचा वापर करु नये : निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेलीसीपीआर मधील नोकरीसाठी कोणत्याही अमिषाला बळी पडू नका : अधिष्ठाता डॉ. एस.एस. मोरे यांचे आवाहनतृतीयपंथी व्यक्तींनी ओळखपत्र मिळवण्यासाठी समाज कल्याण विभागाशी संपर्क साधावा :जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहनडॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट टेबल टेनिस स्पर्धेत अजिंक्यडॉ. डी वाय पाटील पॉलिटेक्निक येथे वाचन संवाद उपक्रमअमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प पर्व! राष्ट्राध्यक्षांचा शानदार शपथविधीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली क्लॉस श्वाब यांची भेट; विक्रमी गुंतवणुकीसाठी दावोसमध्ये महाराष्ट्र पॅव्हेलियन सज्ज

जाहिरात

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली क्लॉस श्वाब यांची भेट; विक्रमी गुंतवणुकीसाठी दावोसमध्ये महाराष्ट्र पॅव्हेलियन सज्ज

schedule20 Jan 25 person by visibility 230 categoryराज्य

दावोस  : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे संस्थापक अध्यक्ष क्लॉस श्वाब यांची भेट घेतली. दावोसमध्ये महाराष्ट्र पॅव्हेलियन आता सज्ज झाले असून, पुढचे दोन दिवस भरगच्च कार्यक्रमांचे असणार आहेत. महाराष्ट्रासाठी विक्रमी सामंजस्य करार यात होणार आहेत आणि विविध कंपन्यांसोबत बैठकाही होणार आहेत.

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे आयोजन दरवर्षी ज्यांच्या पुढाकारातून केले जाते, त्या क्लॉस श्वाब यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. हरित ऊर्जा, ईलेक्ट्रीक व्हेईकल, उद्योग जगतातील अनेक नवीन घडामोडींवर या दोघांमध्ये यावेळी चर्चा झाली. महाराष्ट्राच्या विकासभरारीला त्यांनी यावेळी शुभेच्छाही दिल्या.

यंदाच्या गणेशोत्सवात क्लॉस श्वाब हे एका बैठकीसाठी मुंबईत आले होते. त्यावेळी 12 सप्टेंबर रोजी सपत्नीक त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी येऊन श्रीगणेशाची आरती केली होती. या भेटीत त्यालाही उजाळा देण्यात आला. या बैठकीने आज देवेंद्र फडणवीस यांच्या दावोसमधील भेटी, बैठकांचा श्रीगणेशा झाला.

दावोस येथे साकारलेल्या इंडियन पॅव्हेलियनच्या उदघाटन समारंभाला सुद्धा अनेक केंद्रीय मंत्री, इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत ते हजेरी लावणार आहेत. त्यानंतर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या स्वागत समारंभालाही हे उपस्थित राहणार आहेत. भारतीय वेळेनुसार हा कार्यक्रम मध्यरात्रीनंतर होईल.

▪️होरॅसिसच्या अध्यक्षांसोबत बैठक
तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी होरॅसिसचे अध्यक्ष फ्रँक जर्गन रिक्टर यांचीही भेट घेतली. फ्रँक हे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे माजी संचालक सुद्धा आहेत. येणाऱ्या काळात मुंबईत जागतिक कंपन्यांची एक परिषद आयोजित करण्यासाठी त्यांनी यावेळी पुढाकार दर्शविला. नवीन तंत्रज्ञान, नाविन्य यावर भर देताना असे आयोजन राज्य सरकारसोबत सहकार्याने करण्याबाबत तसेच होरॅसिसचे मुंबईत मुख्यालय असण्याबाबत सुद्धा यावेळी प्राथमिक चर्चा झाली.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes