डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट टेबल टेनिस स्पर्धेत अजिंक्य
schedule21 Jan 25 person by visibility 294 categoryक्रीडा
कोल्हापूर : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या संघाने ' इंटर इंजिनिअरिंग डिप्लोमा स्टुडन्टस स्पोर्ट्स असोसिएशन ' बी-1 झोनच्या विभागीय ( झोनल ) टेबल टेनिस स्पर्धेमध्ये अजिंक्यपद पटकावले. खेळाडूंचे क्रिडा कौशल्य, वेगवान हालचाली, खिलाडूवृत्तीचे प्रदर्शन यांच्या जोरावर अंतिम सामन्यात शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या संघाला पराभूत करत विजेतेपद खेचून आणले.
डिप्लोमा इंजिनिअरिंग स्तरावर ही स्पर्धा अत्यंत प्रतिष्ठेची समजली जाते. विजेत्या संघामध्ये विराज मीनल मुसळे, निलय सचिन पोतुडे, राजवर्धन सरदार सरनोबत, सुमेध संतोष बोलकर, वरद किरण प्रभावळे या खेळाडूंचा समावेश आहे.
संस्थेच्या व्यावसायिक शिक्षण समूहाचे संचालक प्राचार्य विरेन भिर्डी, इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉ. सुहास सपाटे यांच्या हस्ते विजेता - उपविजेता संघाला पारितोषिक प्रदान करण्यात आले.
स्पर्धेचे व्यवस्थापक अमित आवाड, क्रीडाप्रमुख ऋषिकेश मेथे , प्रशिक्षक समन्वयक प्रा. बळीराम पाटील - नंद्याळकर, प्रा. साजिद नाईक यांनी स्पर्धेचे अत्यंत काटेकोर नियोजन करून कार्यवाही केली.
या स्पर्धेच्या यशस्वी संचालनासाठी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेच्या सचिवा प्रा. शुभांगी गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांचे मार्गदर्शन लाभले. विजेत्या संघाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे .