शंभर दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहीमेत कोल्हापूर विभागीय क्रीडा उपसंचालक कार्यालय राज्यात तृतीय क्रमांकावर
schedule25 May 25 person by visibility 111 categoryराज्य

कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाने राबवलेल्या ‘१०० दिवसांची कार्यालयीन सुधारणांची विशेष मोहीम’ अंतर्गत दुसऱ्या टप्प्यात राज्यभरातील विभागीय स्तरावरील शासकीय कार्यालयांची कामगिरीचे मूल्यमापन करण्यात आले. या मूल्यमापनात विभागीय उपसंचालक कार्यालय, क्रीडा व युवक सेवा, कोल्हापूर विभाग, कोल्हापूर या कार्यालयाने उल्लेखनीय कामगिरी करत संपूर्ण राज्यात तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.
या मोहिमेच्या अंतर्गत कार्यालयीन कार्यपद्धतीत पारदर्शकता, कार्यक्षमतेत वाढ, नागरिकाभिमुख सेवा, वेळेवर सेवा पुरवठा व माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आदी निकषांवर मूल्यांकन करण्यात आले. कोल्हापूर विभागातील क्रीडा व युवक सेवा कार्यालयाने या सर्व निकषांवर उच्च कार्यप्रदर्शन करत राज्यात आपले स्थान अधोरेखित केले आहे.
या यशाबद्दल विभागीय उपसंचालक, माणिक पाटील तसेच त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करण्यात येत आहे. कार्यालयाने दाखवलेली ही कार्यक्षमता इतर शासकीय कार्यालयांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे.