SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
आमदार सतेज पाटील यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल: लोकशाही आणि जनहिताचे प्रश्न वाऱ्यावरकाळम्मावाडी धरणातील पाणीपातळी घटल्याने नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा : महापालिकेचे आवाहनमहापौर रुपाराणी निकम यांच्या जनता दरबारात 68 नागरिकांचे अर्ज दाखलबाल व किशोरवयीन कामगार ठेवणाऱ्यांवर कारवाईअभियंत्यांनी उद्योगाभिमुख कौशल्ये आत्मसात करावीत: डॉ. राजाराम गुरवपरिक्षा कालावधीत 100 मीटर परिसरात इलेक्ट्रॉनिक वस्तू बाळगण्यास बंदीतिलारी घाटातील बेवारस महिलेच्या खुनाचा उलगडा; कोल्हापूर पोलिसांच्या कामगिरीवर ५० हजारांचे बक्षीसकोल्हापूरचे किशोर घाटगे यांची 'ग्राहक संरक्षण समिती'च्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी निवडआंतरराष्ट्रीय खेळ दिन: बालपणाचा अविभाज्य आनंद आणि हक्ककोल्हापूर महानगरपालिका : गुरुवारी ‘जनता दरबार’ — महापौर रुपाराणी निकम यांचा उपक्रम

जाहिरात

 

काळम्मावाडी धरणातील पाणीपातळी घटल्याने नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा : महापालिकेचे आवाहन

schedule11 Jun 26 person by visibility 133 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : अलनिनोच्या प्रभावामुळे यावर्षी मान्सून लांबल्याने काळम्मावाडी धरणातील पाणीपातळी कमी झाली असून, काळम्मावाडी धरणातून थेट पाईपलाईन योजनेद्वारे होणारा पाणी उपसा सध्या बंद झाला आहे. परिणामी, या योजनेतून शहराला पाणीपुरवठा  होणार नाही. 

 शहराचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महानगरपालिकेकडून शिंगणापूर, बालिंगा व नागदेववाडी पंपिंग स्टेशनमधून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. आगामी काळातील पावसाची शक्यता तसेच नदीतील उपलब्ध पाणीसाठा विचारात घेऊन या पंपिंग स्टेशनच्या क्षमतेनुसार पाण्याचा उपसा करण्यात येणार आहे.

 पावसाळा पूर्णतः सुरू होईपर्यंत उपलब्ध पाणीसाठा पुरविण्याच्या दृष्टीने पाण्याचा जपून व काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळून उपलब्ध पाण्याचा योग्य वापर करावा व महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes