SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
जोतिबा चैत्र यात्रेसाठी कोल्हापूर पोलिसांचे कडक वाहतूक नियोजन; जड वाहनांना बंदी व पार्किंगचे नवे नियम लागूकोल्हापूर महापालिकेच्यावतीने शहरात रविवारी स्वच्छता मोहिमकोल्हापूरकरांनो पाणी जपून वापरा! सोमवारी शहराचा पाणी पुरवठा बंदडॉ. आलोक जत्राटकर यांच्या ‘समाज आणि माध्यमं’ पुस्तकाला वर्धा येथील मारोतराव नारायणे स्मृती पुरस्कार जाहीरश्वास, ध्यास आणि जगण्याचं शास्त्र... रंगभूमी!कांचनताई परुळेकर यांचा वारसा जपणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली - महापौर रूपाराणी निकम; स्मृतीदालनाचे उद्घाटनसुदृढ तरुण हाच विकसित भारताचा शिल्पकार: जिल्हाधिकारी अमोल येगडेशिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागात 'आजी-माजी विद्यार्थी-पालक मेळावा' उत्साहातघरफाळा दंड सवलत योजनेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; पहिल्याच दिवशी 1.22 कोटींची वसुलीहत्तीरोग निर्मूलनासाठी ‘ट्रीपल ड्रग थेरपी’ (आयडीए) मोहिमेला वेग : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जाहिरात

 

कोल्हापूरकरांनो पाणी जपून वापरा! सोमवारी शहराचा पाणी पुरवठा बंद

schedule27 Mar 26 person by visibility 199 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर  : महावितरण कंपनी तर्फे 33 के.व्ही. लाईनच्या देखभाल दुरुस्तीचे कामकाज सोमवार, दि.30 मार्च 2026 रोजी हाती घेण्यात येणार आहे. यादिवशी विद्यूत पुरवठा बंद रहाणार असलेने पाणी उपसा होऊ शकणार नाही. त्यामुळे शहरातील ए, बी, सी, डी व ई वॉर्ड त्यास सलग्नीत उपनगरे, ग्रामिण भागातील नळ कनेक्शन धारकांना सोमवार, दि.30 मार्च 2026 रोजी होणारा दैनंदिन पाणी पुरवठा बंद राहिल.

 तसेच मंगळवार, दि. 31 मार्च 2026  रोजी होणारा पाणी पुरवठा अपुरा व कमी दाबाने होईल. 

यामध्ये ए, बी, वॉर्ड त्यास सलग्नीत उपनगरे, ग्रामिण भाग व शहराअंतर्गत येणा-या लक्षतीर्थ वसाहत, संपूर्ण फुलेवाडी रिंगरोड, सानेगुरूजी वसाहत, राजेसंभाजीनगर, क्रशर चौक, आपटेनगर टाकी परिसर, राजोपाध्येनगर, कणेरकरनगर, क्रांतीसिंहनाना पाटील नगर, तुळजाभवानी कॉलनी, देवकर पाणंद, टेंभे रोड, शिवाजी पेठ,चंद्रेश्वर गल्ली, तटाकडील तालीम परिसर, साकोली कॉर्नर, उभा मारुती चौक, बिनखांबी गणेश मंदिर परिसर, महाव्दार रोड, मंगळवार पेठ काही भाग. संपूर्ण सी डी वॉर्ड अंतर्गत दुधाळी, गंगावेश, उत्तरेश्वर पेठ, शुक्रवार पेठ, ब्रम्हपुरी, बुधवार पेठ तालिम परिसर, सिध्दार्थनगर, पापाची तिकटी, लक्ष्मीपुरी, शनिवार पेठ, सोमवार पेठ, ट्रेझरी ऑफीस, बिंदु चौक, कॉमर्स कॉलेज परिसर, आझाद चौक, उमा टॉकीज, महालक्ष्मी मंदीर परिसर, गुजरी, मिरजकर तिकटी, देवलक्लब. ई वॉर्ड अंतर्गत खानविलकर पेट्रोल पंप परिसर, शाहुपूरी 5, 6, 7 व 8 वी गल्ली, कुंभार गल्ली व बागल चौक इत्यादी भागांचा समावेश आहे.

तरी नागरीकानी उपलब्ध पाणी काटकसरीने वापरून कोल्हापूर महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes