संत गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त कोल्हापूर शहरात स्वच्छता मोहीम
schedule20 Dec 25 person by visibility 42 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त महानगरपालिकेच्या आरोग्य घनकचरा विभागामार्फत आज शहरातील प्रमुख ठिकाणी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. प्रशासक के.मंजूलक्ष्मी व अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त परितोष कंकाळ व सहा.आयुक्त कृष्णा पाटील यांच्या आदेशाने ही स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली होती.
सदरची स्वच्छता मोहीम सकाळी ७.३० ते १०.०० या वेळेत सीबीएस स्टँड परिसर व रंकाळा टॉवर परिसर या ठिकाणी राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान रंकाळा टॉवर परिसरातून १ ट्रॉली अंदाजे २ टन कचरा संकलित करण्यात आला, तर सीबीएस स्टँड परिसरातून २ ट्रॉली अंदाजे ३ टन असे एकूण अंदाजे ५ टन कचरा व प्लास्टिक गोळा करण्यात आले. संकलित केलेला कचरा महानगरपालिकेच्या कसबा बावडा येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प येथे प्रक्रियेसाठी पाठविण्यात आला.
या स्वच्छता मोहिमेत मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, सर्व आरोग्य निरिक्षक, शहर समन्वयक हेमंत काशीद, मेघराज चडचणकर, स्थानिक नागरिक, दुकानदार, कर्मचारी व सामाजिक संस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून स्वच्छतेचा संदेश दिला.





