शिवाजी विद्यापीठात एमएसएमई व स्टार्टअप्ससाठी मार्गदर्शक संवाद सत्र
schedule20 Dec 25 person by visibility 54 categoryशैक्षणिक
कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील नवोपक्रम, नवसंशोधन व उपक्रम मंडळ, शिवाजी विद्यापीठ यांच्या वतीने नाविन्य व उद्योजकतेच्या क्षेत्रातील भागधारकांसाठी संवादात्मक सत्राचे आयोजन शुक्रवार, दि. १९ डिसेंबर २०२५ रोजी करण्यात आले. या सत्रात भारत सरकारच्या राष्ट्रीय एमएसएमई बोर्डाचे सदस्य प्रदीप पेशकर प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.
या सत्रात एमएसएमई धोरणे व शासकीय सहाय्य योजना, स्टार्टअप्सच्या वाढी व विस्ताराच्या संधी, नवोपक्रम, बौद्धिक संपदा (IP) तसेच उद्योजकता परिसंस्थेचा विकास या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. श्री. पेशकर यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती देत उद्योजकांनी त्या योजनांचा प्रभावी लाभ कसा घ्यावा, याबाबत मार्गदर्शन केले.
तसेच उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरे देत थेट संवाद साधला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्र-कुलगुरू प्रा. ज्योती जाधव, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांनी भूषविले. सदर संवाद सत्र सर्वांसाठी अत्यंत मार्गदर्शक असे संबोधित केले. उपस्थितांचे स्वागत, संचालक प्रा. सागर डेळेकर यांनी केले.
यावेळी श्रीनिवास गायकवाड, काव्यश्री नलवडे तसेच स्टार्टअप्स, उद्योजक, पेटंटधारक इनक्युबेटीज मोठ्या संख्येने उपस्थित होते.





