SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये रोजगार मेळावा उत्साहात; स्वप्नपूर्तीमुळे तरुणांना आनंदपरिपूर्ण शाहू जन्मस्थळाचे लोकार्पण लवकरच : सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार; शाहू महाराजांना अभिवादन, जन्मस्थळाची पाहणीकोल्हापुरात प्रलंबित आयटी पार्कच्या जागेचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावा : भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांचे ॲड.आशिष शेलार यांना निवेदन कोल्हापूरचा महापौर महायुतीचाच करण्याचा निर्धार; नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेत घातले लक्ष"राजर्षी शाहू प्रजावत्सल, दिनदलीतांचे तारणहार,समतचे पुरस्कर्ते व कर्ते समाजसुधारक होते." : डॉ. सुनीलकुमार सरनाईकडी.के.टी.ई. च्या प्रा. व्ही. बी. मगदुम यांना पी.एच.डी. प्रदानकोल्हापूर जिल्ह्यात 10 जुलै पर्यंत बंदी आदेश लागूतळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला पद्मश्री डॉ.जब्बार पटेल भव्य सोहळ्यात यंदाचा राजर्षी शाहू पुरस्कार प्रदानमराठी भाषा अनिवार्य; हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक : शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसेलोकराजा छत्रपती शाहू महाराजांच्या जयजयकाराने दुमदुमले कोल्हापूर

जाहिरात

 

कोल्हापूर जिल्ह्यात 10 जुलै पर्यंत बंदी आदेश लागू

schedule27 Jun 25 person by visibility 119 categoryराज्य

 कोल्हापूर  : जिल्ह्यात विविध पक्ष, संघटना यांच्याकडुन त्यांच्या विविध मागण्यांकरीता आंदोलन, उपोषण, मोर्चा इ. प्रकारची आंदोलने करण्यात येत असून विविध पक्षाकडून रॅली, सभेचे आयोजन करण्यात येत आहे. तसेच जिल्ह्यात यात्रा, सण, उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होणार आहेत.

 यामुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (अ) ते (फ) आणि कलम 37 (3) अन्वये अपर जिल्हादंडाधिकारी संजय तेली यांनी संपूर्ण जिल्ह्यात दिनांक 28 जून 2025 रोजी सकाळी 6 वाजल्यापासून ते दिनांक 10 जुलै 2025 रोजी रात्री 24 वा. पर्यंत बंदी आदेश जारी केला आहे.

 हा हुकूम ज्या सरकारी अधिकारी, कर्मचारी यांना त्यांची कर्तव्य, अधिकार बजावण्यासंदर्भात कामकाज करताना उपनिर्दिष्ट वस्तू हाताळाव्या लागतात आणि एकत्र जमावे लागते व ज्या व्यक्तींनी पोलीस अधीक्षक अगर संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी अगर संबंधित विभागाचे पोलीस निरीक्षक किंवा सक्षम प्राधिकारी यांची परवानगी घेतलेली आहे, अशा व्यक्तींना तसेच सर्व जाती धर्माचे सण/उत्सव/जयंती/यात्रा, इ. हे शांततामय मार्गाने साजरे करण्याकरीता जमा होणारा जनसमुदाय यांना व लग्न, इतर धार्मिक समारंभ, सण, यात्रा, प्रेतयात्रा इत्यादी यांना लागू असणार नाही.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes