SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
माजी सरन्यायाधीश भूषण गवई, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याकडून पाटील कुटुंबीयांचे सांत्वनसैनिक टाकळी एमआयडीसीचा विरोध खरा, की यड्रावकरांना घेरण्याचा डाव? मार्केट कमिटीच्या बैठकीनंतर शिरोळ तालुक्यात जोरदार चर्चाकोल्हापूरला कायमस्वरुपी खंडपीठ लवकरच होईल : माजी सरन्यायाधीश भूषण आर. गवईअभियंत्यांनी नोकरी शोधणारे नाही, तर नोकऱ्या देणारे व्हावे " राज्यपाल जिष्णु देव वर्मासांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासाठी आमदार यड्रावकर यांचा निर्णायक पाठपुरावासंगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात स्वच्छता व वर्कशॉप कर्मचाऱ्यांचा सत्कारसंगीताच्या सुरावटीत घामाचा सन्मान! 'संगीतसूर्य'च्या नूतनीकरणाच्या मंचावर स्वच्छता कर्मचाऱ्यांचा रांगडा कलाविष्कारकोल्हापूर : कपडे आणायला गेलेल्या पत्नीचा निर्घृण खून; नराधम पतीने १० वर्षांचा संसार संपवला!सामान्य नागरिकाला दर्जेदार आरोग्य सेवा देणार : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेदुष्काळमुक्त महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जाहिरात

 

माजी सरन्यायाधीश भूषण गवई, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याकडून पाटील कुटुंबीयांचे सांत्वन

schedule16 Aug 26 person by visibility 172 categoryसामाजिक

कोल्हापूर  : माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनानंतर रविवारीही पाटील कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठी गर्दी केली होती. सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी यशवंत निवासस्थानी भेट देऊन डॉ. डी. वाय. पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण  करून आदरांजली वाहिली. यानंतर  डॉ. संजय डी. पाटील, आमदार सतेज डी. पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह पाटील कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. 

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. दादांच्या निधनाने महाराष्ट्राचे व देशाचेही मोठे नुकसान झाल्याची भावना  गवई यांनी यावेळी व्यक्त केली. 

रविवारी दिवसभरात माजी सरन्यायाधीश भूषण गवई, माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे, त्यांच्या पत्नी नीलम राणे, सांगलीचे खासदार विशाल पाटील, खासदार प्रतिभा धानोरकर,  खासदार निलेश लंके, माजी आमदार शिरीष कोतवाल, शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी, बबलू जाधव, अमर खानापुरे, अण्णासाहेब भोज,  राष्ट्रीय सरपंच संसद चे प्रमुख समन्वयक योगेश पाटील, जितेंद्र भोसले, माजी आमदार सतीश चव्हाण पाटील, अभिजीत लुनिया, सचिन पवार , रामचंद्र नांद्रे गुरुजी यांच्यासह   राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी  यशवंत निवासस्थानी भेट देऊन डॉ. संजय डी. पाटील, आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, तेजस पाटील यांच्यासह कुटुंबीयांचे सांत्वन केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes