काँग्रेसने केली इंडिया आघाडीबरोबर चर्चा
schedule13 Dec 25 person by visibility 86 categoryराज्य
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत इंडिया आघाडी म्हणून लढण्यासाठी चर्चेची प्राथमिक फेरी शनिवारी झाली. यात काँग्रेसने नेमलेल्या समितीने सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली. त्यानंतर इंडिया आघाडीतील भाकप, माकप, आप व शेकापच्या पदाधिकाऱ्यांसमवेत चर्चा करण्यात आली.
कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक एकसंघपणे लढण्यासाठी महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेसने एक पाऊल पुढे टाकत घटक पक्षांशी चर्चा करण्यासाठी समिती नेमली आहे. ही समिती उद्धवसेना, राष्ट्रवादी शरद पवार गट व इंडिया आघाडीतील इतर पक्षांशी १३ ते १६ डिसेंबर या कालावधीत चर्चा करून त्याचा अहवाल १७ डिसेंबरला काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते तथा जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांना देणार आहे. यानुसार या समितीने शनिवारी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाबरोबर चर्चा केली.
काँग्रेस पक्षाच्यावतीने आनंद माने, सचिन चव्हाण, राजू लाटकर, विक्रम जरग, तौफिक मुल्लाणी, भारती पोवार, भरत रसाळे, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी कडून आर. के. पवार, सुनील देसाई, गणेश नलवडे, पद्मजा तिवले, भाकपचे दिलीप पवार, रघुनाथ कांबळे, माकप उदय नारकर, शेकाप बाबुराव कदम, आम आदमीचे उत्तम पाटील, अभिजीत कांबळे, मोईन मोकाशी उपस्थित होते. उद्या ही समिती उद्धवसेनेबरोबर चर्चा करणार आहे.