कोल्हापूर महापालिकेच्या 53 व्या वर्धापन दिनानिमित्त देशाच्या रक्षणाकरीता धारातीर्थ पडलेल्या जवानांच्या वीरमाता, वीरपिता व वीरपत्नी यांचा सत्कार
schedule12 Dec 25 person by visibility 44 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या 53 व्या वर्धापन दिनानिमित्त चा सोमवार, दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 9.00 वाजता महापालिकेच्या मुख्य इमारतीमधील कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकामध्ये प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात येणार आहे. ध्वजारोहनानंतर देशाच्या रक्षणाकरीता धारातीर्थ पडलेल्या जवानांच्या वीरमाता, वीरपिता व वीरपत्नी यांचा सत्कार महापालिकेच्यावतीने करण्यात येणार आहे. यानंतर उत्कृष्ठ काम केलेल्या कर्मचा-यांचाही सत्कार करण्यात येणार आहे.
वर्धापन दिनानिमित्त महापालिकेच्यावतीने शनिवार दि.13 ते सोमवार दि.15 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 5.00 ते रात्री 9.30 वाजेपर्यंत ताराबाई पार्क, सासणे ग्राऊंड येथे खाद्य महोत्सवाचे आयोजनही करण्यात आले आहे. या खाद्य महोत्सवात शहरातील विविध महिला बचत गटांचा सहभाग असून तब्बल 50 प्रकारचे खाद्यपदार्थ स्टॉल्स येथे उभारले जाणार आहेत.
यासोबतच या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम, स्पॉट गेम, फनी गेम आदींनी सजलेले मनोरंजन कार्यक्रमही नागरीकांसाठी आयोजित केले आहेत. तरी या खाद्य महोत्सवाचा जास्तीत जास्त नागरीकांनी लाभ घ्यावा असे आवाहन महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.