कंत्राटदार नोंदणीस 15 मे पर्यंत मुदतवाढ
schedule12 May 26 person by visibility 118 categoryराज्य
कोल्हापूर : मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते कामासाठी आवश्यक यंत्रसामग्री व साहित्यपुरवठा करणे यांचे दर जिल्हास्तरीय समितीने निश्चित केलेले आहेत. विधानसभास्तरीय समितीने निश्चित केलेल्या कामासाठी कामे करण्यास इच्छुक असणाऱ्या ग्रामविकास/सार्वजनिक बांधकाम विभागाकडे नोंदणीकृत असणाऱ्या मक्तेदार यांना शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कामे वाटप करण्यात येणार आहेत.
274 कोल्हापूर दक्षिण, 275 करवीर, 276 कोल्हापूर उत्तर या 03 विधानसभा मतदारसंघ क्षेत्रासाठी वरील प्रमाणे नोंदणीकृत मक्तेदार यांची विधानसभा मतदारसंघनिहाय पॅनेलमध्ये नावे समाविष्ट करण्यासाठी व यासोबत जोडलेल्या अटी व शर्तीनुसार मंजूर केलेली कामे करण्यास इच्छुक असणाऱ्या मक्तेदारांकडून अर्ज व तांत्रिक अटी पूर्ततेचे कागदपत्रे मागविण्यासाठी 15 मे पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती करवीर उपविभागीय कार्यालयातर्फे देण्यात आली.