+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustअटल सेतूच्या मुख्य भागावर कोणतेही तडे नाहीत adjustयेत्या काळात मुंबई प्रदूषण, खड्डे, वाहतूक कोंडीमुक्त करणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे adjustकाश्मिरमध्ये लवकरच महाराष्ट्र सदन उभारणार : सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण adjustनियमित योग साधनेतून वैश्विक ऊर्जा प्राप्त : कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के adjustअन्न प्रक्रिया उद्योगातील नोंदणीकृत वैयक्तिक लाभार्थ्यांना प्रशिक्षण adjustसंजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये 'आंतरराष्ट्रीय योग दिवस' उत्साहात adjustकोल्हापूर महानगरपालिका : 6 टक्के सवलतीचा लाभ घेण्यासाठी सुट्टीच्या दिवशीही नागरी सुविधा केंद्रे सुरु adjustशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी राजर्षि छत्रपती शाहू महाराज जयंती उत्सवानिमित्त के.एम.टी. उपक्रमामार्फत "ऐतिहासिक वास्तू दर्शन" सहलीसाठी विशेष बससेवा adjustचप्पल लाईन येथील विद्युत सेवावाहिनी शिफ्टिंगचे काम सुरु; 'आप'च्या मध्यस्तीस यश adjustशिवाजी स्टेडियम येथील जलतरण तलावासाठी 35 लाखाची तरतूद करा : आमदार जयश्री जाधव; जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना केली सूचना
SMP_news_Gokul_ghee
schedule31 Oct 23 person by visibility 464 categoryशैक्षणिक
कसबा बावडा : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाने संशोधनाचा वापर सर्वसामान्यासाठी व्हावा यासाठी नेहमीच प्रयत्न केला आहे. नव्याने सुरू होत असलेले ‘डी. वाय. पाटील सेन्टर फॉर सायंटिफिक सोशल रिस्पॉन्सिबिलीटी' केंद्र वैज्ञानिक ज्ञान समाजापर्यंत पोहचविण्यात नक्कीच महत्वाची भूमिका बजावेल असा विश्वास  डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी व्यक्त केला.

 डी. वाय. पाटील गुपचे संस्थापक पद्मश्री आदरणीय डॉ. डी. वाय. पाटील (दादासाहेब) यांच्या वाढदिवसानिमित्त डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठामध्ये  ‘डी. वाय. पाटील सेन्टर फॉर सायंटिफिक सोशल रिस्पॉन्सिबिलीटी’चा प्रारंभ कुलपती डॉ संजय डी. पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी बोलताना डॉ. पाटील म्हणाले, विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडीसीप्लेनरी स्टडीजने आतापर्यंत केलेल्या वेगवेगळ्या संशोधनामुळे संस्थेच्या नावलौकीकात अधिकच भर पडली आहे. नव्याने स्थापन झालेल्या 'डी. वाय. पाटील सेन्टर फॉर सायंटिफिक सोशल रिस्पॉन्सिबीलीटी" च्या माध्यमातून हे संशोधन व विज्ञान ग्रामीण भागापर्यंत पोहोचेल. समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन वाढविण्यासाठी हे केंद्र महत्वाची भूमिका बजावेल.
     
  रिसर्च डायरेक्टर डॉ. प्रा. सी. डी. लोखंडे यांनी प्रास्तविकामध्ये गेल्या काही वर्षामध्ये विद्यापीठाने संशोधनामध्ये घेतलेली झेप व विभागाच्या इतर उपक्रमाबद्दल विस्तृत माहिती दिली.

 संशोधक डॉ. जयवंत गुंजकर यांनी केंद्राच्या उद्देशांची माहिती दिली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक शिक्षणाची गोडी निर्माण करणे, देशभरातील संशोधकांना एकत्र आणून सुसंवाद साधणे, वैज्ञानिक क्षेत्रातील अद्ययावत ज्ञान समाजातील प्रत्येक घटकापर्यत पोहचविणे, विद्यार्थ्यांच्या चिकित्सक वृत्तीस चालना देणे, प्रथमोपचाराबद्दलची प्रशिक्षण देणे, पौगंडावस्थेतील आरोग्यविषयक माहिती पुरविणे, समाजाच्या गरजा आणि समस्या ओळखण्यासाठी आणि वैज्ञानिक आणि तांत्रिक उपाय विकसित करण्यासाठी सहयोग करणे इत्यादी उद्देश ठेऊन हे केंद्र काम करणार असल्याचे त्यानी सांगितले. 

  कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल म्हणाले, यूजीसी, डीएसटी-एसईआरबी च्या धोरणामध्येही सामाजिक जबाबदारीचे महत्व नमूद करण्यात आले आहे. या केंद्राच्या माध्यमातून वैज्ञानिक ज्ञान समाजापर्यंत पोहचविण्यास मदत होईल. 

यावेळी  विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलसचिव डॉ.  व्ही. व्ही. भोसले, परीक्षा नियंत्रक अभय जोशी, मेडिकल कॉलेजचे डीन डॉ.  राकेश शर्मा,  उपकुलसचिव संजय जाधव, डॉ. मेघनाद जोशी, सिआयआर विभागाचे प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व संशोधक विदयार्थी उपस्थित होते.