डी. वाय. पाटील आभियांत्रिकी प्रेसिडेंट कपचा विजेता; हॉस्पिटल संघाला उपविजेतेपद; डॉ. संजय डी. पाटील यांच्याहस्ते पारितोषिक वितरण
schedule11 Feb 25 person by visibility 301 categoryक्रीडा

कोल्हापूर : डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या प्रेसिडेंट कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात डी. वाय. पाटील अभियांत्रिकी संघाने डी. वाय. पी हॉस्पीटल संघावर विजय मिळवत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव करण्यात आला.
डी. वाय पाटील हॉस्पिटलच्या मैदानावर गेल्या १ ते ९ फेब्रुवारी दरम्यान प्रेसिडेंट कप स्पर्धेचा थरार रंगला होता. डी. वाय. पाटील ग्रुपच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या विविध संस्थांच्या 24 संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. प्रकाश झोतात झालेल्या स्पर्धेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला.
स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात डी. वाय. पी हॉस्पीटलने कृषी व तंत्र विद्यापीठ संघाचा तर दुसऱ्या सामन्यात अभियांत्रिकी संघाने पॉलीटेक्निक संघाचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात डी. वाय. पाटील अभियांत्रिकी संघाने नाणेफेक जिकूंन प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हॉस्पिटल संघाने मोसीन सनदी (20 चेंडूमध्ये 40) आणि अजित पाटील यांनी (16 चेंडूत 22 धावा) यांच्या फलंदाजीच्या जोरावर 8 षटकात 4 गडी बाद 78 धावा केल्या. हे आव्हान अभियांत्रिकी संघाने केवळ 4.3 षटकात पार करत विजेतेपदावर मोहर उमटवली. प्रतिक पाटीलच्या धुवाधार ६१ धावा ( 22 चेंडू) आणि सचिन माने यांच्या केवळ 3 चेंडूत 16 धावा विजय सहज सोपा केला. अभियांत्रिकी संघाच्या प्रतीक पाटील यांना मालिकावीर तर यात संघाच्या अक्षय भोसले यांना सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
महिलांच्या गटात डी वाय पी वुमन वॉरियर अ संघाने डी वाय पी वुमन वॉरियर्स ब संघावर विजय मिळवत विजेतेपद मिळवले.
यावेळी अजित पाटील बेनाडीकर, स्पर्धेचे संयोजक प्रोजेक्ट हेड सदानंद सबनीस, डी वाय पाटील ग्रुप चे कार्यकारी संचालक डॉ. ए.के. गुप्ता, डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, डॉ. आर के शर्मा, डॉ. शिम्पा शर्मा, आदी उपस्थित होते. डॉ सदानंद सबनीस, बाबुराव वांगळे, रावसाहेब पाटील, नायक , अमोल उपासे, कुणाल पोवाळकर, सुमेध कांबळे, किरण कांबळे, विकास कुरणे यानी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.