डीकेटीईमध्ये ‘टेक्स्टव्हिजन फॅशनोव्हा २०२५‘ आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे भव्य आयोजन
schedule12 Feb 25 person by visibility 300 categoryशैक्षणिक

इचलकरंजी : डीकेटीई, टेक्स्टाईल असोसिएशन इंडिया मिरज युनिट (टायमु) आणि स्टुडट चाप्टर ऑफ टायमु यांच्या संयुक्त विद्यमाने टेक्स्टव्हीजन आणि फॅशनोव्हा २०२५ या आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना टेक्स्टाईल क्षेत्रातील नवीन संधी आणि आव्हानांबददल जाणून घेण्याची संधी मिळाली. त्यांच्या कल्पकतेचे आणि कौशल्याचे सादरीकरण करण्याचा हा एक उत्तम मंच ठरला.
ही स्पर्धा गेली २७ वर्षापासून डीकेटीईमध्ये आयोजित करण्यात येत आहे. यावर्षीच्या स्पर्धेची थीम होती ‘स्मार्ट टेक्स्टाईल रिव्हॉल्यूएश : मटेरिएल्स मशिन्स आणि मेथडस रिडाफाईंड‘. या थीममध्ये डिझाईन कलेक्शन व प्रेझेंटेशन, पेपर प्रेझेंटेशन, आय ऑन पिक ग्लास व स्टार्टेक्स ६.० अशा विविध स्पर्धांचा समावेश करण्यात आला होता. ओडिसा, तमिळनाडू, बेंगलोर, मुंबई, नाशिक, पुणे, लातूर, संभाजीनगर, तासगाव इ. भागातून सुमारे २०० हून अधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. यावेळी संपूर्ण राजवाडा परिसर विद्यार्थ्यांनी वस्त्रोद्योगातील आधुनिक कल्पकतेने सजविला होता.
कार्यक्रमाची सुरवात दिपप्रज्वलनाने करण्यात आली. संस्थेच्या संचालिका, डॉ एल.एस.अडमुठे यांनी स्वागतपर भाषणात डीकेटीईच्या प्रगतीचा आलेख मांडला. त्यांनी विद्यार्थ्यांना नवनविन गोष्टी एक्स्प्लोर, एक्सपअरिमेंट आणि इन्व्होवेट करण्यासाठी प्रोत्साहन दिले. विद्यार्थ्यांनी अशा टेक्नीकल स्पर्धेमधून सहभाग घेवून उत्तम अभियंता बनण्याचे आपले स्वप्न साकार करावे असे नमूद केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे एन.डी.म्हात्रे, मॅनेजिंग डायरेक्टर, इटमा आणि अंजन प्रियदर्शनी, एचआर, सागर मॅन्युफॅक्चरींग प्रा.लि. यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. एन.डी. म्हात्रे यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी अशा स्पर्धेमध्ये सहभाग घेवून आपल्या कलागुणांनाचे सादरीकरण करावे. भविष्याच्या दृष्टीने वाटचाल करताना समाजाला काहीतरी देण्याची भावना मनात नेहमी जागृत ठेवावी असे प्रतिपादन केले. आर संपत, प्रेसिडंट टायमु यांनी टेक्स्टाईल असोसिएशनच्या उपक्रमाचा आढावा घेतला. टायमु प्रेसिडंट, प्रथमेश सारडा यांनी टेक्टव्हिजन फॅशनोव्हा स्पर्धेची पार्श्वभुमी सांगितली. कार्यक्रमाचे संयोजक आर.एच. देशपांडे यांनी आभार व्यक्त केले.
कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ सपना आवाडे व सर्व ट्रस्टी, इन्स्टिटयूटचे उपसंचालक प्रा.डॉ.यु.जे. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. या स्पर्धेसाठी दिपक दोडिया, स्वप्निल लाटे, प्रियंका मगदूम, निलेश यादव, भालचंद्र बक्षी, स्वप्निल देशमुख, यांनी परिक्षणाचे काम पाहिले. कार्यक्रमाचे संयोजन डॉ. व्ही.के.ढंगे यांनी केले. या कार्यक्रमासाठी टायमु सचिव, डॉ एस.एस. लवटे यांच्यासह सर्व कोर्स कोर्डिनेटर, प्राध्यापक यांची प्रमुख उपस्थिती होती.