SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
भागीरथी महिला संस्थेच्यावतीने कळंबा कारागृहातील बंदीजनांना राखी बांधून दिली बहिणीची माया आणि स्नेह, कारागृहातील बंदीजन भारावलेनांदणीच्या नागरिकांनी विधान परिषदेतील काँग्रेसचे गट नेते आमदार सतेज पाटील यांची भेट घेऊन, मानले आभारग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा एल्गार; जिल्हा परिषदसमोर ठिय्या आंदोलनकोल्हापूर जिल्ह्यात 24 ऑगस्ट पर्यंत बंदी आदेश लागूखासदार धनंजय महाडिक यांनी घेतली केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे यांची भेट, केंद्र शासनाच्या खेलो इंडिया योजनेतून कोल्हापुरातील हॉकी स्टेडियमसाठी १ कोटी ३७ लाख रुपयांचा निधी वर्गसंजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये सीबीएसई क्लस्टर IX ॲथलेटिक स्पर्धेचा उद्घाटन समारंभ उत्साहात स्वातंत्र्यसैनिकांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे विद्यापीठात प्रदर्शन सुरू; ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त उपक्रमडीकेटीईच्या मेकॅनिकल इंजिनिअरींग विद्यार्थ्यांची राष्ट्रीय नवोन्मेष अभियानात चमकदार कामगिरीसंगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाची उभारणी गुणवत्तापूर्ण होईल : मंत्री उदय सामंतमराठवाड्यात ‘गोकुळ’ ची दूध व दुग्धजन्य उत्पादने उपलब्ध करणार : नविद मुश्रीफ; लातूर आणि नांदेड परिसरात गोकुळचा विस्ताराचा प्रयत्न

जाहिरात

 

डीकेटीईच्या मेकॅनिकल इंजिनिअरींग विद्यार्थ्यांची राष्ट्रीय नवोन्मेष अभियानात चमकदार कामगिरी

schedule08 Aug 25 person by visibility 98 categoryराज्य

इचलकरंजी : डीकेटीई मधील मेकॅनिकल विभागातील विद्यार्थ्यांनी नवोन्मेष हेच भविष्य घडवते हा विश्‍वास कृतीत उतरवत पाच महिन्याच्या कालावधीत देशातील शाळेमध्ये राष्ट्रीय स्तरावरील मेड इन थ्रीडी सीड द फयुचर एंटरप्रनरर्स या प्रतिष्ठेच्या कार्यक्रमांतर्गत प्रोफेशनल मेंटर्स म्हणून शालेय विद्यार्थ्यांना थेट मार्गदर्शन करण्याची ऐतिहासिक संधी साधली.  


हा उपक्रम ‘ला फांउडेशन द सॉल्ट सिस्टीम‘ व ‘लेंड अ हॅण्ड इंडिया‘(लाही,पुणे)या स्वयंसेवी संस्थेच्या संयुक्त विद्यमानाने राबविण्यात आला होता यासाठी नीती आयोगाच्या अटल टिंकरिंग लॅब्स च्या दूरदृष्टीपूर्ण संकल्पनेवर आधारित देशातील निवडक शाळांमध्ये एक प्रशिक्षित शिक्षक आणि सहा विद्यार्थ्यांचा स्टार्टअप शैलीतली संघ तयार करुण त्यांना सीड फंडिग च्या माध्यमातून त्यांच्या सृजनशील कल्पनांना प्रत्यक्ष उत्पादनात बदलण्याची संधी मिळाली.

 पुणे येथील या स्पर्धेमध्ये इन्व्होवेशन, डिझाईन आणि उदयोजकता या संकल्पनेवर आधारित सादरीकरण करण्यात आले. या स्पर्धेत देशभरातील २६० हून अधिक महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता यामध्ये डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनी आपला ठसा उमठवला.
डीकेटीई कडून अनुज लुगडे व अरमान नायकवडी यांनी अटल इन्व्होवेशन मिशन,नीती आयोग, दिल्ली व द सॉल्ट सिस्टीम या अंतरराष्ट्रीय कंपनीच्या माध्यमातून या स्पर्धेत सहभाग घेवून चमकदार कामगिरी केली. या दोन्ही विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रकल्पांसाठी प्रत्येकी रु २१ हजार उत्पादन विकास निधी आणि रु ६ हजार मानधन देण्यात आले. त्याचबरोबर पुण्यातील कारीगर स्कुल ऑफ अप्लाईड लर्निंग येथे उदयोग तज्ञांकडून अत्याधुनिक मेंटॉरशिप प्रशिक्षण घेण्याची अमूल्य संधी मिळाली. या प्रशिक्षणातून त्यांनी प्रत्यक्ष उदयोगात वापरल्या जाणा-या द सॉल्ट सिस्टीमच्या थ्री डी एक्सपेरिएन्स सॉफटवेअर चा सखोल अभ्यास केला.

संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे व सर्व विश्‍वस्त यांनी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना संचालिका प्रा.डॉ.एल.एस.अडमुठे, डे.डायरेक्टर डॉ यु.जे.पाटील, विभागप्रमुख डॉ व्ही. आर. नाईक, प्रा. सुयोग रायजाधव यांचे मार्गदर्शन लाभले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes