भारत सरकारच्या एनटीटीएम मिशन अंतर्गत डीकेटीईस १०.२१ कोटींचा प्रकल्प मंजुर
schedule06 May 26 person by visibility 113 categoryशैक्षणिक
इचलकरंजी : येथील डीकेटीईच्या टेक्स्टाईल अॅण्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूटला भारत सरकारच्या वस्त्र मंत्रालयांतर्गत नॅशनल टेक्नीकल टेक्स्टाईल मिशन(एनटीटीएम) कडून टेक्नीकल टेक्स्टाईलच्या शैक्षणिक क्षेत्रातील पायाभूत सुविधा उभारण्यासाठी रु. १०.२१ कोटींचा प्रकल्प मंजुर झालेला आहे. डीकेटीई मध्ये उपलब्ध असलेली अत्याधुनिक यंत्रसामुग्री, सातत्याने सुरु असलेले संशोधन आणि एनटीटीएम कडून मिळालेल्या या प्रकल्पामुळे टेक्नीकल टेक्स्टाईल क्षेत्रातील उदयोगवाढीस मोठी चालना मिळणार आहे.
एनटीटीएम हे भारत सरकारच्या वस्त्र मंत्रालयाने सुरु केलेले महत्वाकांक्षी अभियान असून, या माध्यमातून देशातील टेक्नीकल टेक्स्टाईल उदयोगाला गती देणे, कुशल मनुष्यबळ तयार करणे आणि स्वदेशी उदयोगांना प्रोत्साहन देणे यावर भर दिला जात आहे. यामुळे संशोधन, विकास आणि बाजारवाढ यांना बळकटी मिळणार आहे.
भारत सरकारच्या या मिशनअंतर्गत डीकेटीईचे एनबीए व नॅक अॅक्रिडेटेशन यांसह विविध निकषांवर मुल्यांकन करण्यात आले. या प्रकल्पामुळे संस्थेत उभारण्यात येणा-या आधुनिक शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील करिअरच्या संधी उपलब्ध करुण देणार आहेत.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, उपाध्यक्ष माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव प्रा.डॉ. सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे तसेच सर्व पदाधिकारी यांचा संस्थेच्या माध्यमातून औद्योगिक विकास साधण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न राहिला आहे. या प्रकल्पाच्या मंजुरीमुळे स्थानिक तसेच राष्ट्रीय पातळीवर औद्योगिक विकासाला अधिक बळ मिळणार आहे.
सदर प्रकल्प साकरण्यासाठी संचालिका प्रा.डॉ.एल.एस.आडमुठे, उपसंचालक डॉ यु.जे.पाटील, डीन प्रा. डॉ.एस.बी. व्हनबट्टे तसेच टेक्स्टाईल विभागातील सर्व प्राध्यपकांनी विशेष परिश्रम घेतले आहेत.
🔳 डीकेटीईला मंजुर झालेला एनटीटीएम प्रकल्प हा केवळ संस्थेसाठीच नव्हे, तर इचलकरंजीच्या औद्योगिक प्रगतीसाठी मोठा टप्पा आहे. या माध्यमातून इचलकरंजीला टेक्निकल टेक्सटाईल हब म्हणून विकसित करण्याला गती मिळेल, स्थानिक उद्योगांना नवी उर्जा मिळेल आणि विद्यार्थ्यांसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील करिअरच्या अधिक संधी निर्माण होतील. असे मनोगत उपाध्यक्ष डीकेटीई माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी व्यक्त केले.