SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
डी वाय पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचा विजेतासंजय घोडावत विद्यापीठाचा क्यू-स्पायडर्स, बंगळुरूसोबत शैक्षणिक व प्लेसमेंट करारकोल्हापूर ते मिरज रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी 984 कोटींचा निधी मंजूर, लवकरच दुहेरीकरणाचे स्वप्न पूर्ण होणार : खासदार धनंजय महाडिक विभागीय क्रीडा संकुलाच्या १९५ कोटींच्या सुधारित आराखड्यास विभागीय समितीची मंजुरीकुंभोज येथील सरस्वती साधना केंद्र व ग्रंथालय प्राचीन संस्कृती रक्षणासाठी महत्वपूर्ण : ललित गांधीसंजय घोडावत ग्रुप व वारणा उद्योग समूह यांच्या संयुक्त उपक्रमातून पहिल्या विमान प्रवासाची स्वप्नपूर्तीकामांना गती देत दर्जेदार सुविधा आणि सर्वसमावेशक विकासावर भर द्या : पालकमंत्री प्रकाश आबिटकरजेव्हा पालकमंत्र्यांची कौतुकाची थाप पाठीवर पडते तेव्हा ...२ मार्चपासून सकाळ आणि संध्याकाळच्या सत्रात कोल्हापूर-मुंबई मार्गावर विमानसेवा सुरू होणारविशेष संख्याशास्त्रीय सादरीकरणात कवठेमहांकाळचे महाविद्यालय प्रथम

जाहिरात

 

डी वाय पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचा विजेता

schedule12 Feb 26 person by visibility 111 categoryराज्य

पुणे  : भारती विद्यापीठ पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय ‘खेलो भारती’ आंतर महाविद्यालय फुटबॉल स्पर्धेत कोल्हापूरच्या डी वाय पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर संघाने विजेतेपद मिळवले आहे.

 ही इंजीनियरिंग आणि आर्किटेक्चर विद्यार्थ्यांसाठी आयोजित या स्पर्धेत  एकूण १८ संघांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेमध्ये डी वाय पाटील आर्किटेक्चर संघाने पहिल्या साखळी सामन्यात प्रिन्स शिवाजी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर संघावर २-० गोलफरकाने विजय मिळवला. सिंहगड कॉलेज संघावर १-० तर भारती विद्यापीठ संघावर १-० ने विजय मिळवत  उपांत्य फेरी गाठली. उपांत्य सामन्यातही  प्रिन्स शिवाजी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर संघावर १-० असा विजय मिळवत दिमाखात  अंतिम फेरीत प्रवेश केला. 

अंतिम सामन्यात विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इंजीनियरिंग कॉलेज संघावर दोन अप्रतिम गोल करत डी वाय पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर संघाने विजेतेपदावर नाव कोरले.

   विजेत्या संघात कर्णधार अनिश पवार,  गोलरक्षक यश पवार,  ओम सुतार,  रितेश कोरवी,  श्रेयस खवरे, आदित्य गवळी, वेदांत खारशिंगे, विजयसिंह घाडगे, पुष्कर मालगावकर, देवाशीष सरनोबत, आर्यन खवटे, प्रसाद पाटील, सुजल हळदे, यश पवार, अथर्व जाधव या खेळाडूंचा समावेश होता.

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता,  प्राचार्य डॉ. संतोष चेडे,  डीन स्टुडन्ट अफेयर्स प्रा. डॉ. राहुल पाटील,  आर्किटेक्चर विभाग प्रमुख प्रा. आय एस जाधव व क्रीडा समन्वयक प्रा. कृष्णाली पाटील यांचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes