सहकार पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्यास 31 जुलै पर्यंत मुदतवाढ
schedule21 Jul 25 person by visibility 228 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : राज्याच्या सहकार चळवळीच्या विकासात उत्कृष्ट योगदान देणा-या सहकारी संस्थांना राज्य शासनामार्फत सहकार पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. सन 2023-2024 या आर्थिक वर्षातील कामगिरीच्या आधारावर सहकार पुरस्कारासाठी संस्थांची निवड करण्यासाठीचा कालबध्द कार्यक्रम जाहीर केला होता. परंतू, सहकार आयुक्तलयाकडून सहकारी संस्थांना संबंधित तालुका उप, सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करण्यास दि.31 जुलै 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे यांनी दिली आहे.
पुरस्काराविषयी अधिक माहिती सहकार विभागाच्या http://sahakarayukta.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर तसेच जिल्हा उपबंधक, तालुका उपनिबंधक, सहाय्यक निबंधक यांच्या कार्यालयात उपलब्ध आहे.
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 अंतर्गत नोंदणी झालेल्या इच्छुक सहकारी संस्थांनी विहीत नमुन्यातील प्रस्ताव आवश्यक त्या कागदपत्रांसह दि.31 जुलै पर्यंत दाखल करावेत, असे आवाहन करे यांनी केले आहे.